हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । NHAI : सध्या देशात रस्ते विकासाचे काम वेगाने सुरु आहे. त्याअंतर्गत दररोज सुमारे 25 किलोमीटरचा महामार्ग बांधला जातो आहे. NHAI कडून दररोज 40 किमीचा महामार्ग बांधण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे. जो आणखी वाढवून दररोज 50 किलोमीटरपर्यंत नेण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. मात्र 1 किमीचा हायवे बांधण्यासाठी सरकारला किती खर्च येत असेल ??? असा विचार कधी आपल्या मनात आला आहे का??? नसेल तर हे जाणून घ्या कि, सध्या एक किलोमीटरचा रस्ता बनवण्यासाठी 30 कोटी रुपये खर्च केले जातात. ज्यामध्ये बांधकाम साहित्य आणि मजुरीच्या खर्चाव्यतिरिक्त जमीन संपादनाचा खर्च देखील सामील आहे.
काही वर्षांपूर्वीपर्यंत यासाठी 25 कोटी रुपये खर्च येत होता. मात्र जमिनी आणि वस्तूंच्या किंमती वाढल्यामुळे आता जास्त खर्च येतो आहे. एका बातमीनुसार, 2020 ते 2021 पर्यंत बांधकाम साहित्याच्या किंमतींत 50-60 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे स्टीलच्या दरात 30-40 टक्के आणि सिमेंटच्या दरात 10-15 टक्के वाढ झाली आहे.
11 महिन्यांत बांधण्यात आला 8000 किमी रस्ता
रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, गेल्या वर्षी एप्रिल ते या वर्षीच्या फेब्रुवारी अखेरपर्यंत 8045 किमीचा महामार्ग बांधण्यात आले. अशा प्रकारे दररोज 24 किमीपेक्षा जास्त महामार्ग बांधण्यात आला. 2020-21 मध्ये NHI कडून एका दिवसात 37 किमीचा महामार्ग तयार करण्याचा विक्रमही करण्यात आला होता. 2020-21 मध्ये एकूण 13, 327 किमी लांबीचा महामार्ग बांधण्यात आला. त्यानंतर 2021-22 मध्ये 10,457 किमी तर 2019-20 मध्ये फक्त 10,237 किमीचा महामार्ग बांधण्यात आला.
अजूनही 40% प्रकल्प विलंबित
राज्यसभेत केंद्र सरकारकडून दिलेल्या निवेदनानुसार, सध्या 40 टक्के रस्ते प्रकल्पांना उशीर झाला आहे. फेब्रुवारी 2023 पर्यंत एकूण 1801 प्रकल्पांवर काम सुरू आहे. त्यापैकी 725 रस्ते प्रकल्पांना उशीर झाला आहे. पर्जन्य, सामान्या पातळीपेक्षा जास्त पाऊस, कोविड-19 महामारी, स्टीलसहीत इतर कच्च्या मालाच्या किंमतीत झालेली वाढ याचे कारण सरकारने यावेळी दिले आहे. याशिवाय अनेक ठिकाणी भूसंपादनात करताना आलेल्या अडचणी आणि कायदेशीर पेच यामुळेही या कामांना उशीर होतो आहे. NHAI
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://nhai.gov.in/
हे पण वाचा :
Amazon Prime मेंबरशिपवर मिळवा 50% सूट, कसे ते जाणून घ्या
Earth : पृथ्वीचा शेवट कसा होईल ??? अखेर शास्त्रज्ञांनी शोधून काढले उत्तर
EPFO च्या सदस्यांसाठी खुशखबर !!! सरकारने PF वरील व्याजदरात केली वाढ
सरकार वाढवू शकते PAN-Aadhar Linking ची अंतिम मुदत, द्यावी लागणार लेट फीस
Banking Crisis : अमेरिकेतील बँकिंग संकट आता युरोपच्या उंबरठ्यावर, ‘ही’ दिग्गज बँक बुडण्याच्या मार्गावर