नवी दिल्ली | राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA)ने देशभर छापे मारले असून महाराष्ट्रातून एका महिलेला अटक करण्यात आली आहे. आयएसआयएस या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयातून या महिलेला अटक करण्यात आली आहे.
NIA Sources: NIA is carrying out searches at 3 locations in Hyderabad and one in Wardha, against ISIS module. pic.twitter.com/rxaeJJAlT8
— ANI (@ANI) April 20, 2019
‘आयएसआयएस’ भारतात घातपात घडवण्याच्या उद्देशाने आपले गुप्तहेर भारतात पेरत असावी. त्यांच्या हा मनसुब्यावर पाणी फेरण्यासाठी भारतीय तपास यंत्रणेने दक्ष राहून हि कार्यवाही केली आहे. या आधी हि भारतातून आयएसआयएसशी निगडीत असंख्य लोक पकडण्यात आले आहेत.
महाराष्ट्रातील वर्धा या ठिकाणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने छापे टाकून एका महिलेला ताब्यात घेतले आहे. त्याच प्रमाणे हैदरबाद शहरात देखील चार ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत.