मुंबई । महाराष्ट्राच्या पहिला महिला निवडणूक आयुक्त असलेल्या नीला सत्यनारायण यांचे निधन आज पहाटे झाले. सत्यनारायण यांना कोरोनाची लागण काही दिवसांपूर्वी झाली होती. त्यांच्यावर मुंबईतील सेव्हन हिल्स या रुग्णालयात उपचार सुरू होते. अखेर आज पहाटे त्यांची प्राणज्योत मावळली.
नीला सत्यनारायण या १९७२ च्या बॅचच्या सनदी अधिकारी होत्या . त्यांचा जन्म ५ फेब्रुवारी१९४९ रोजी झाला होता. त्या ७१ वर्षाच्या होत्या. नीला सत्यनारायण या सनदी अधिकाऱ्याबरोबरच उत्तम लेखिकाही होत्या. सरकारी अधिकारी म्हणून त्यांचा ३७ वर्षाचा कारकीर्द होता. या कारकिर्दीत त्यांनी गृह, वनविभाग,माहिती आणि प्रसिद्ध विभाग, समाजकल्याण आणि ग्रामीण विकास यांसारख्या अनेक विभागात अधिकारी म्हणून काम केले आहे.
नीला सत्यनारायण या कठोर प्रशासकीय अधिकारी होत्या. त्यांनी हिंदी, इंग्रजी, मराठी भाषेत पुस्तके लिहली आहेत. तसेच त्या कवयित्री आणि उत्तम स्तंभलेखिका म्हणून ही प्रसिद्ध होत्या. नीला सत्यनारायण यांनी अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांसाठी दिग्दर्शनाचे काम पाहिले होते.