हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आगामी लोकसभा निवडणुकीत 2024 साठी शिवसेनेनं उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्यासाठी मावळ मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेसला सोडावा अशी इच्छा राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्यानंतर महाविकास आघाडीत खळबळ उडाली आहे. यावरून शिवसेना- राष्ट्रवादीत मतभेद सुरू असतानाच भाजप नेते निलेश राणे यांनी पार्थ पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
निलेश राणे यांनी ट्विट करत म्हंटल की, पार्थ पवार हेलिकॉप्टरने फिरण्या पलीकडे काही करत नाही, हा पुण्याचा पेंग्विन आहे. असं असले तरी पिंपरी चिंचवड लोकसभा सीट राष्ट्रवादी ढापणार आणि शिवसेनेच्या बरणेंना घरी पाठवणार.
पार्थ पवार हेलिकॉप्टरने फिरण्या पलीकडे काही करत नाही, हा पुण्याचा पेंग्विन आहे. असं असले तरी पिंपरी चिंचवड लोकसभा सीट राष्ट्रवादी ढापणार आणि शिवसेनेच्या बरणेंना घरी पाठवणार.
— Nilesh N Rane (Modi ka Parivaar) (@meNeeleshNRane) March 22, 2022
दरम्यान, मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस वर जोरदार टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेला डिवचण्याचा मुद्दाम प्रयत्न करत आहे. मावळ लोकसभेची जागा सोडण्याची मागणी केली की ती करायला लावली हे शोधलं पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या स्वभावाचा गैरफायदा घेत आहे, असा गंभीर आरोप बारणे यांनी केलाय.