हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना खासदार संजय राऊत आणि राणे कुटुंबीय यांच्यातील वाद नवा नाही. केंद्र सरकारने कृषी कायदे रद्द केल्यानंतर संजय राऊत यांनी भाजपवर तोफ डागली होती. आपला देश लोकशाहीच्या प्रक्रियेतून बाहेर पडून संपूर्ण खासगीकरणाच्या जोखडात जात असल्याचा आरोप सामना अग्रलेखातून करण्यात आला होता. यानंतर आता भाजप नेते निलेश राणे यांनी संजय राऊतांवर अत्यंत कडक शब्दांत जहरी टीका केली आहे.
संज्या किती जरी शेती कायद्यांचा विषय घेऊन नाचलास तरी महाराष्ट्रात शिवसेनेला आता कुत्र भिक घालणार नाही. देशाच्या स्वातंत्र्या वर असा बोलतो जसं ह्याच्यामुळेच देशाला स्वातंत्र्य मिळालं, सत्तेचा गैरवापर करून एका महिलेला छळणारा देशाच्या पंतप्रधानांवर बोलतो ह्या पेक्षा दुर्भाग्य काय?
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) November 20, 2021
संज्या किती जरी शेती कायद्यांचा विषय घेऊन नाचलास तरी महाराष्ट्रात शिवसेनेला आता कुत्र भिक घालणार नाही. देशाच्या स्वातंत्र्या वर असा बोलतो जसं ह्याच्यामुळेच देशाला स्वातंत्र्य मिळालं, सत्तेचा गैरवापर करून एका महिलेला छळणारा देशाच्या पंतप्रधानांवर बोलतो ह्या पेक्षा दुर्भाग्य काय? असे ट्विट निलेश राणे यांनी केलं आहे.
संजय राऊत नेमकं काय म्हणाले-
आजची पहाट शेतकऱ्यांसाठी स्वातंत्र्याची पहाट ठरली आहे. शेतकऱ्यांच्या संघर्षापुढे सरकारला झुकावं लागलं. शेतकऱ्यांसाठी हा खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य दिन आहे. शेतकऱ्यांनी हे स्वातंत्र्य लढून मिळवलं आहे. भिकेत मिळालं नाही, असा म्हणत संजय राऊतांनी भाजप आणि अभिनेत्री कंगना रणावतला खोचक टोला लगावला आहे