हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विधान परिषदेच्या 10 जागांसाठी आज मतदान पार पडले. 10 जागांसाठी 11 उमेदवार रिंगणार असल्यामुळे या निवडणुकीत अधिक चुरस पाहायला मिळाली. दरम्यान भाजपच्या दोन आमदारांच्या मतदानावर काँग्रेसने आक्षेप घेतल्यामुळे भाजप नेत्यांनी आक्रमक पावित्रा घेतला आहे. भाजपचे नेते निलेश राणे यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली आहे. आमदार श्री मुक्ता टिळक व श्री लक्ष्मण जगताप कॅन्सर सारख्या रोगाशी झुंजत आहेत, कर्तव्य पोटी त्यांना मतदान करायची इच्छा असल्यामुळे ते आले पण काँग्रेस वाल्यांचा नीचपणा काही जात नाही, अशी टीका राणेंनी केली आहे.
निलेश राणे यांनी ट्विट करत काँग्रेसवर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे की, आमदार श्री मुक्ता टिळक व श्री लक्ष्मण जगताप कॅन्सर सारख्या रोगाशी झुंजत आहेत, कर्तव्य पोटी त्यांना मतदान करायची इच्छा असल्यामुळे ते आले पण काँग्रेस वाल्यांचा नीचपणा काही जात नाही. काँग्रेसवाल्यांनी त्यांच्या मतांवर आक्षेप घेतला, कर्तुत्व शून्य लोकचं आजारपणाचा अपमान करू शकतात, असे राणेंनी म्हंटले आहे.
आमदार श्री मुक्ता टिळक व श्री लक्ष्मण जगताप कॅन्सर सारख्या रोगाशी झुंजत आहेत, कर्तव्य पोटी त्यांना मतदान करायची इच्छा असल्यामुळे ते आले पण काँग्रेस वाल्यांचा नीचपणा काही जात नाही. काँग्रेसवाल्यांनी त्यांच्या मतांवर आक्षेप घेतला, कर्तुत्व शून्य लोकचं आजारपणाचा अपमान करू शकतात.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) June 20, 2022
दरम्यान, काँग्रेसने भाजपच्या दोन नेत्याच्या मतदानावर हरकत घेत राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रारही केली. मात्र, त्यांचा अर्ज निवडणूक आयोगाने फेटाळून लावला आहे. आता भाजपच्या आणखी काही नेत्यांकडून काँग्रेसकडून निशाणा साधला जाणार आहे.