पवार साहेब, मुख्यमंत्री म्हणतीलच, मी म्हणतोय ना तुम्हाला राष्ट्रपती, मग आज पासून तुम्ही राष्ट्रपती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | येत्या 18 जुलै रोजी राष्ट्रपती पदासाठी निवडणूक होणार असून विरोधकांकडून राष्ट्रपती पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावाची चर्चा सुरू होती. मात्र खुद्द शरद पवार यांनीच आपण राष्ट्रपती पदाच्या शर्यतीत नाही अस म्हणत या चर्चेतील हवा काढली. यानंतर भाजप नेते निलेश राणे यांनी ट्विट करत यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.

पवार साहेब, राष्ट्रपती निवडणुक पराभवाच्या भीतीने माघार घेण्याचा निर्णय तुमचा योग्य आहे कारण तुमच्याकडे मुख्यमंत्री आहेत. ते म्हणतील तुम्हाला “मी म्हणतोय ना तुम्हाला राष्ट्रपती, मग जिंकायची गरज काय, आज पासून तुम्ही राष्ट्रपती अस ट्विट निलेश राणे यांनी केले

यापूर्वी औरंगाबाद शहराच्या नामांतरावरून बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले होते की, मी म्हणतोय ना संभाजीनगर, मग नामांतरांची गरज काय?? मुख्यमंत्र्यांच्या त्याच विधानावरून निलेश राणे यांनी त्यांची आज पुन्हा एकदा खिल्ली उडवली आहे. दरम्यान, देशात 18 जुलै रोजी राष्ट्रपती पदासाठी निवडणूक होणार असून 21 जुलै ला मतमोजणी पार पडेल.

Leave a Comment