हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन : नारायण राणे यांना अटक केल्याने मंगळवारचा दिवस विशेष चर्चेचा ठरला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरील वादग्रस्त वक्तव्य राणे यांच्या अंगलट आले. नाशिक पोलिसांनी सदर वादग्रस्त विधानानंतर राणे यांना अटक केल्याने राजकिय वातावरण तापले. रात्री उशीरा राणे यांना जामिन मंजूर झाला. मात्र या घटनेनंतर शिवसेना अन् राणे समर्थक यांच्यात वाद पेटला आहे.
काल पूर्ण ठाकरे सरकार आणि शिवसेना कामाला लागली, महाराष्ट्रासाठी नाही राणेंसाठी. काल आमचे जे सहकारी व कार्यकर्ते शिवसेनेला भिडले त्यांचा मनापासून आभार. शिवसेनेचे मुख्यमंत्री, मंत्री, कार्यकर्ते पदाधिकारी यांनी टोकाचे प्रयत्न करून सुद्धा आमचं काही उखाडू शकले नाही असं म्हणत राणे यांनी औकात कळली का असा सवाल केला आहे.
काल पूर्ण ठाकरे सरकार आणि शिवसेना कामाला लागली, महाराष्ट्रासाठी नाही राणेंसाठी. काल आमचे जे सहकारी व कार्यकर्ते शिवसेनेला भिडले त्यांचा मनापासून आभार. शिवसेनेचे मुख्यमंत्री, मंत्री, कार्यकर्ते पदाधिकारी यांनी टोकाचे प्रयत्न करून सुद्धा आमचं काही उखाडू शकले नाही. औकात कळली??
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) August 25, 2021
दरम्यान, नारायण राणे यांनी जामिन मिळाल्यानंतर सत्यमेव जयते असं ट्विट करुन आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. तसेच नितेश राणे यांनी एक खास व्हिडिओ शेअर करत करारा जवाब मिलेगा असा संदेश देत शिवसेनेला चिथावणी दिलीय. आता भाजप अन् राणे समर्थल यावर काय पाऊल उचलतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.