हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या शिवसेना नेते तसेच सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत हे त्यांच्या सामनामधील अग्रलेखांमुळे चांगलेच चर्चेत आहेत. मध्यंतरी त्यांनी काँग्रेस पक्षावर टीका करीत खाट का कुरकुरते आहे? अशी टीका केली होती. त्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांशी मुख्यमंत्र्याची चर्चा झाली तेव्हा गैरसमज दूर झाले असल्याचे चित्र आहे. आता राऊत यांनी थोरातांची कुरकुर नाहीच! विखेंची टुरटुर हा अग्रलेख लिहिला आहे. या अग्रलेखाची चांगलीच चर्चा सुरु आहे. यावर आता निलेश राणे यांनी त्यांचे नाव घेतले असल्याचे ऐकून संजय राऊत यांना दम भरला आहे.
या अग्रलेखात राऊत यांनी एक दोन बाटगे नगर जिल्ह्यात आहेत. आणि दोनेक बाटगे तळकोकणात आहेत. असा उल्लेख केला आहे. तसेच मूळ पक्षात सर्व काही भोगून आणि मिळवून सत्तेसाठी पक्षांतरे करणाऱ्यांना महाराष्ट्र माफ करत नाही. हे त्या प्रत्येकाच्या बाबतीत दिसून आले आहे असे देखील म्हंटले आहे. यावर निलेश राणे यांनी ‘कोणतरी म्हणत होतं आज सामन्यातून आमच्यावर नाव न घेता टीका केली आहे. संज्या… ही भीती तुझ्या मनातली अशीच कायम राहिली पाहिजे. बाकी विषय ‘सामना’ पेपर चा तो तर नेहमीप्रमाणे झोपडपट्टीत लहान मुलं पुसायला वापरतीलंच.’ असे ट्विट करून दम भरला आहे.
निलेश राणे यांच्या या ट्विटनंतर याच्यावर राऊत समर्थक आणि राणे समर्थक यांच्या मिश्र प्रतिक्रिया दिसून येत आहेत. निलेश राणेंना आता राऊत काय उत्तर देतात. याकडे बऱ्याच जणांचे लक्ष लागले आहे. राणेंनी मात्र नेहमीप्रमाणे आपल्या विशेष स्टाईल मध्ये पलटवार केला आहे.