हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| कोरोनानंतर आता देशात निपाह व्हायरसने (Nipah Virus) दहशत निर्माण केली आहे. गेल्या काही दिवसांमध्येच निपाह व्हायरसच्या रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे या व्हायरसचे भीती नागरिकांच्या मनात निर्माण झाली आहे. मुख्य म्हणजे, निपाह वायरसने मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या ही कोरोना व्हायरसच्या मृत रुग्णांपेक्षा जास्त असल्याचे समोर आले आहे. सध्या निपाह व्हायरसमुळे रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. यामुळे निपाह व्हायरसला आटोक्यात आणण्यासाठी भारतीय वैज्ञानिक सर्वपरीने प्रयत्न करत आहेत.
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे प्रमुख डॉ. राजीव बहल यांनी माहिती दिली आहे की, निपाह व्हायरसचा मृत्यूदर 40-70 टक्के आहे तर कोविडचा मृत्यू दर 2-3 टक्के आहे. शुक्रवारी केरळच्या कोझिकोडमध्ये निपाह विषाणूच्या एका नवीन प्रकरणाची पुष्टी झाली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण संक्रमित लोकांची संख्या सहा झाली आहे. यातील दोन जणांचा मृत्यू झाला आहे. बाकी रुग्णांवर वैज्ञानिकांकडून योग्य ते उपचार करण्यात येत आहेत.
सध्या केरळमध्ये रुग्णांच्या संख्येत होत असलेली वाट बघून भारताने ऑस्ट्रेलियाला निपाह व्हायरसवर उपचार करण्यासाठी मोनोक्लोनल अँटीबॉडीजचे आणखी 20 डोस देण्याची विनंती केली आहे. तसेच भारतात देखील निपाह व्हायरसला रोखण्यासाठी लवकरच लस तयार करण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे. परंतु तोपर्यंत भारताला बाहेरून डोस मागवावे लागणार आहेत. भीतीचे कारण म्हणजे, निपाह व्हायरमुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण कोरोनापेक्षा जास्त आहे.
दरम्यान, डॉ. बहल यांनी यांच्या माहितीनुसार, सध्या वैज्ञानिकांकडे फक्त 10 रुग्णांवर उपचार करू शकतील एवढीच औषधे आहेत. यात 2018 मध्ये ऑस्ट्रेलियाकडून मोनोक्लोनल अँटीबॉडीजचे काही डोस मिळालेले आहेत. जर निपाह रुग्णांच्या संख्येत वाढ झाली तर भारतापुढे पुन्हा एक नवीन मोठे संकट उभे राहू शकते. सध्या निपाह रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
निपाह व्हायरस
सर्वात प्रथम देशात 2001 मध्ये निपाह व्हायरसचा उद्रेक झाला होता. निपाह व्हायरसचा संसर्ग वटवाघुळ आणि डुकरांपासून होत आहे. आता निपाह व्हायरसचा संसर्ग झालेल्या रुग्णांचा मृत्यू होण्याची शक्यता 40 ते 70 टक्के असल्याची माहिती वैज्ञानिकांनी दिली आहे. देशात निपाह व्हायरसच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. परंतु अद्याप भारतात या व्हायरसला रोखू शकणारी कोणतीही लस अस्तित्वात आलेली नाही. यावर उपचार सपोर्टिव्ह केअरच्या मदतीने करण्यात येत आहेत.