सोनियाजी, मी तुमच्यासमोर हात जोडते, पण आम्हाला एकटं पाडू नका..!! – निर्मला सीतारामन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | कोरोना संकटाच्या काळात जगभरातील सर्वच राजकारण्यांचा कस लागला आहे. अनेक देशांचे प्रमुख हे नक्की काय करायचंय, लॉकडाऊन ठेवायचा की नाही, कामगारांचं जगणं कसं वाचवायचं या विचारात आहेत. भारतातील सत्ताधारी भाजप सरकारपुढेही हा प्रश्न आहेच. या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ‘आत्मनिर्भर भारतासाठी’ २० लाख कोटी रुपयांचं पॅकेज नुकतंच जाहीर करण्यात आलं. या पॅकेजची विस्ताराने माहिती देत असताना आज झालेल्या पाचव्या पत्रकार परिषदेत निर्मला सीतारामन यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासमोर हात जोडले.

स्थलांतरित आणि इतर कामगारांच्या प्रश्नावर काम करण्यासाठी आम्हांला विरोधी पक्षांच्या मदतीची आवश्यकता आहे. या प्रश्नावर आमच्यावर टीका करण्याआधी आमच्याशी बोला, आपण मिळुन या प्रश्नावर मार्ग काढू अशी विनंती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सोनिया गांधी यांना केली. या प्रश्नावर काँग्रेस पक्षाकडून विविध उपाययोजना माध्यमांद्वारे सांगितल्या जात आहेत. विविध अर्थतज्ञ आणि पत्रकार लोकांशी संवाद साधणाऱ्या राहुल गांधी यांनी शनिवारीच दिल्लीतील रस्त्यांवर बसलेल्या मजुरांना भेट देऊन या प्रश्नाचं गांभीर्य सरकारपुढे मांडलं होतं. यालाच आज सीतारामन यांनी उत्तर दिलं आहे.

https://twitter.com/RahulGandhi/status/1260895626465665025?s=19

मुद्द्यांची सोडवणूक करण्यासाठी भावनिक होण्याचं भाजप नेत्यांचं अस्त्र जुनंच आहे. देशप्रेमाच्या नावाखाली अशी अनेक आवाहनं जनतेलाही करण्यात आली होतीच. आता या विनंतीवर सोनिया गांधी काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं रंजक ठरेल.

Leave a Comment