मुंबई । विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत. आज संध्याकाळी ५.३० वाजता शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारकात या दोघांची भेट होणार आहे. देवेंद्र फडणवीस हे मागचे २ दिवस निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसलेल्या कोकण दौऱ्यावर होते. यानंतर आता निसर्ग चक्रीवादळाबाबत भाजपच्या मागण्यांचं निवेदन भाजप मुख्यमंत्र्याना देणार आहे. कोरोनावरील सर्वपक्षीय बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यी उद्धव ठाकरे यांच्यात आज प्रत्यक्ष भेट होत आहे. या भेटीकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
दरम्यान, कोकण दौऱ्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारने दिलेली मदत तोकडी असल्याचं सांगितलं. कोकणासाठी जाहीर केलेलं पॅकेज फायद्याचं नसल्याचं फडणवीस म्हणाले. चक्रीवादळात कोळी बांधवांचं नुकसान झालं, पण त्यांचा या पॅकेजमध्ये उल्लेखही नाही. कोळी बांधवांना बोटींच्या दुरुस्तीसाठी दीड लाख रुपये लागणार आहेत, पण त्यांच्यासाठी सरकारने काहीच दिलं नाही. कोळी बांधवांसाठी किमान १० हजारांची तातडीची मदत दिली पाहिजे, अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा.
ब्रेकिंग बातम्यासाठी : www.hellomaharashtra.in