नितेश राणेंनी पुन्हा ट्विट करत महापौरांना दिले ‘हे’ आव्हान

0
76
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी पत्रकार परिषद घेत नारायण राणे व भाजपवर निशाणा साधला. यावेळी त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिशा सॅलियनवर बलात्कार झाला आणि तिची हत्या झाली असा आरोप राणेंकडून केला जात आहे. त्यामुळे दिशाची बदनामी थांबवावी यासाठी महिला आयोगाने पुढाकार घ्यावा, असे म्हंटले. त्यावर नितेश राणे यांनी पुन्हा ट्विट करत महापौरांना थेट आव्हान दिले.

भाजप नेते नितेश राणे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे की, महापौर ताई.. दिशा सालियनची मृत्यूनंतरही बदनामी, व्यथित झालेय. बरोबर. खरंच तीला न्याय मिळालाच पाहीजे. म्हणून तिच्या खऱ्या आरोपींना शिक्षा कशी होईल त्या साठी एक महिला म्हणून तुम्ही पुढे या..मी येतो महिला आयोगाकडे तुमच्या बरोबर..वेळ आणि तारीख कळवा !, असे आव्हान राणे यांनी दिले आहे.

काय केली आहे महापौरांनी टीका ?

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज पत्रकार परिषदेवेळी भाजप नेत्यांवर टीका केली. भाजपच्या आरोपांमुळे दिशाच्या चारित्र्याचे हणन होत आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना विनंती आहे की यावर कारवाई करा. भाजपच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांनाही सांगेन महिला म्हणून यात लक्ष घाला. मृत्यूनंतर ही बदनामी करणं महाराष्ट्राला शोभणार नाही. एका मुलीचा मृत्यू झालाय मात्र तिची बदनामी चालली आहे. तिच्या कुटुंबियांनी वारंवार सांगूनही हे महिलांच्या इज्जतीला किंमत देत नाहीत, अशी टीकाही महापौरांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here