“उद्धव ठाकरे हिंमत असेल तर मला अटक करा,”; किरीट सोमय्यांचे थेट आव्हान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्याकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व त्याच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्यावर सातत्याने टीका केली जात आहे. दरम्यान आज त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आव्हान दिले. “हिंमत असेल तर मला अटक करा, असे सोमय्या यांनी म्हंटले.

किरीट सोमय्या यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “आतापर्यंत जे काही मी आरोप केलेले आहेत ते सर्व खरे आहेत. कारण मी पुराव्याशिवाय एकही शब्द बोलत नाही. उद्धव ठाकरेंचे सरपंच मिसाळ हे मी ज्यावेळी 2020 मध्ये गेलो होतो, त्यावेळी सांगतात, आहेत बंगले. पैसे घेतायत त्यात तुझं काय? असं म्हणत काय शिव्या दिल्या होत्या मला त्यावेळी.

छगन भुजबळांना दोन वर्षे तुरुंगात रहावे लागले. आता सत्तेत आले तर त्या बेनामी संपत्तीची पाहणी करायला किरीट सोमय्या गेले तर किरीट सोमय्याला लगेच नोटीस. मी उद्या सकाळी साडेअकरा वाजता सांताक्रुझ पोलीस स्टेशनमध्ये जाणार आहे. आणि त्या ठिकाणी तक्रार दाखल करणार आहे. उद्धव ठाकरे हिंमत असेल तर करा मला अटक.” असे सांगत सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आव्हान दिले.

Leave a Comment