हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | संतोष परब हल्ल्याप्रकरणी अडचणीत आलेले भाजप आमदार नितेश राणे यांच्या तब्बेतीवरून विरोधकांनी टीका केली होती. आज न्यायालयीन कोठडीतून सुटका होताच नितेश राणे यांनी विरोधकांना समाचार घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला. जेव्हा ईडी कारवाईची वेळ येते किंवा सरकार पडण्याची वेळ येते तेव्हाच मुख्यमंत्री आजारी का पडतात असा सवाल त्यांनी केला.
नितेश राणे म्हणाले, मला ब्लड प्रेशरचा त्रास आहे. हा सगळा आरोग्याचा विषय आहे तो न्यायालयीन कोठडी आहे म्हणून करतोय, अस म्हणणारे, जे काही लोक माझं शूगर लेव्हल तपासायचे ते काय खोटे होते का?? 152 ब्लड प्रेशर होत. मी काय मशीनमध्ये बोट घातलं होत का कुणाच्याही तब्येतीवर असा प्रश्न विचारण हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला साजेस आहे का? असा सवाल त्यांनी केला.
मी बोललो तर अनेकांना बीपीचा त्रास सुरू होईल अस म्हणत त्यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. सरकार पडण्याची वेळ येते. ईडीची कारवाई होते, तेव्हाच मुख्यमंत्र्यांच्या गळ्यात पट्टा कसा येतो? हा प्रश्न आम्ही विचारावा का? अधिवेशनावेळीच मुख्यमंत्री आजारी का पडतात? मविआच्या नेत्याना ईडीच्या कारवाईवेळीच कोरोना कसा होतो? असा सवाल नितेश राणे यांनी केला.
ते पुढे म्हणाले, मी पोलिसांसमोर स्वतः सरेंडर झालो. ज्या दिवशी मी हजर राहिलो त्यावेळी मला सर्वोच्च न्यायलयाचं प्रोटेक्शन होते. तरीही मी हजर राहिलो, मला ज्याप्रमाणे अडवण्यात आलं. माझ्या कार्यकर्त्यांवर चुकीचे आरोप लावण्याचे प्रयत्न करण्यात आले. यामुळे मी विचार केला की कुणालाही तसेच सिधुदूर्गच्या जनतेला यापुढे त्रास नको म्हणून मी सरेंडर झालो. पण म्हणजे मला हे सरकार अटक अजूनही करू शकले नाहीये. मी स्वतः च सरेंडर झालो आहे..