नितेश राणे हरवला आहे, माहिती देणाऱ्यास कोंबडी बक्षीस; मुंबईत पोस्टरबाजी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | संतोष परब हल्ल्याप्रकरणी भाजप आमदार नितेश राणे हे अडचणीत असून सध्या ते अज्ञातवासात आहेत. याच पार्श्वभूमीवर मुंबईत विरोधकांकडून पोस्टरबाजी सुरू आहे. नितेश राणे हरवला आहे असून शोधून देणाऱ्यास कोंबडी बक्षीस अशी पोस्टर मुंबईत लावण्यात आली आहेत.

मुंबईतील चर्चगेट स्टेशनबाहेर राणेंचा बॅनर लावण्यात आले आहे. बॅनरवर नितेश राणे यांचा एक फोटो असून ते हरवले असल्याचे म्हटले आहे. तसेच त्यांना शोधून काढणाऱ्या व्यक्तीला कोंबडी बक्षीस देण्यात येईल, असेही लिहिण्यात आले आहे. नितेश राणे पोलिसांसमोर येत नसल्याने मुंबईत पोस्टबाजी करण्यात आली आहे. मात्र, हे बॅनर कोणी लावले आहे, याबाबत त्यावर काहीही उल्लेख करण्यात आलेला नाही.

दरम्यान, काल सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाने नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्या नंतर राणेंवर अटकेची टांगती तलवार आहे. अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर नितेश राणे पोलिसांसमोर हजर होणार का? किंवा पोलीस नितेश राणेंना अटक करणार का? असा सवाल केला जात आहे.

Leave a Comment