ओवेसीला 10 मिनिटांसाठी आमच्या हवाली करा, याला औरंगजेबाकडे नाही पाठवला तर…; नितेश राणेंचं जाहीर आव्हान

0
401
Nitesh Rane Akbaruddin Owaisi
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एमआयएम पक्षाचे आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांनी खुलताबाद येथील औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन घेतले. यावरून भाजप आमदार नितेश राणे यांनी ट्विटच्या माध्यमातून अकबरुद्दीन ओवेसी याच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी “मी आव्हान करतो पोलिसांना 10 मिनिटं बाजूला करा याला औरंगजेबाकडे नाही पाठवला तर आम्ही शिवरायांचे मावळे नाही,” असे नितेश राणे यांनी म्हंटले आहे.

नितेश राणे यांनी ट्विट करत जाहीर आव्हान दिले असून त्यांनी ओवेसी यांच्यावर टीकाही केली आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, “मी आव्हान करतो…पोलिसांना 10 मिनिटं बाजूला करा…याला औरंगजेबाकडे नाही पाठवला तर आम्ही शिवरायांचे मावळे नाही,” असे राणेंनी म्हंटले आहे.

तसेच त्यांनी राज्य सरकारवरही निशाणा साधला आहे. “ओवेसीला माहित आहे की, मी औरंगजेबाच्या थडग्यासमोर नागडा नाचलो तरी मला दोन पायावर महाराष्ट्रात फिरता येईल. कारण राज्यामध्ये नामर्दांचे सरकार आहे. याला म्हणतात यांचे खरे हिंदुत्व,” अशी टीका राणे यांनी केली आहे.

ठाकरेंना जमत नसेल तर अकबरुद्दीनला आमच्या हवाली करा

दरम्यान नितेश राणे यांनी माध्यमांशीही संवाद साधला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही आव्हान दिले. ते म्हणाले की, “उद्धव ठाकरेंना जमत नसेल तर आम्ही आमदार, खासदार, भाजपा वैगेरे नंतर आहोत, आधी मराठा, शिवप्रेमी आहोत. जर संभाजीराजे, शिवरायांचा कोणी अपमान करत असेल तर फक्त 10 मिनिटांसाठी अकबरुद्दीनला आमच्या हवाली करा. त्याला तिथेच रांगेत झोपवलं नाही तर महाराजांसमोर नतमस्तक होणार नाही,” असे राणे यांनी म्हंटले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here