संजय राऊत चायनीज, भाजपवर बोलाल तर ठाकरेंचे कपडे फाडणार; राणेंचा इशारा

rane raut thackeray
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोकणातील भाजप नेत्याच्या 100 सेल कंपन्या आहेत. त्यात काही हजार कोटींचा भ्रष्टाचार झाला आहे. नंतर हे नेते भाजपात गेले. केंद्रीय पदावर गेले असा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नाव न घेता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर केल्यानंतर आता राणेंचे सुपुत्र आणि भाजप आमदार नितेश राणे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. इथून पुढे भाजपच्या नेत्यांना काही बोलला तर ठाकरेंचे कपडे फाडणार असा थेट इशारा राणेंनी दिला आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना नितेश राणे म्हणाले, संजय राऊतांसारखी माणसे चोरबाजारात स्वस्तात मिळतात. इथून पुढे संजय राऊत आमच्याबद्दल किंवा भाजप नेत्यांबद्दल काही बोलले तर मी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची कपडे ठेवणार नाही, टराटरा फाडेन असा थेट इशारा नितेश राणे यांनी दिला. इथून पुढे भाजपच्या प्रमुख नेत्यांबद्दल राऊत काही बोलले तर अर्ध्या तासात उद्धव आणि आदित्य ठाकरेंचे कपडे मी फाडणार त्यामुळे त्यांनी ठरवावं कि उद्धव आणि आदित्य ठाकरेंची किती इज्जत ठेवायची असं राणे यांनी म्हंटल.

नारायण राणे हे 39 वर्ष शिवसेनेत होते त्यामुळे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या सगळ्या गोष्टी आम्हला माहित आहेत त्यामुळे आमच्यावर बोलताना संजय राऊतांनी विचार करून बोलावं. तुम्हाला भ्रष्ट्राचाराचे आरोप करायची खुमखुमी असेल आणि पुरावे असतील तर कोर्टात जावा आणि खटला चालवा, तुम्हाला कोणी थांबवलंय असा सवाल नितेश राणे यांनी केला. पण त्यापूर्वी हे लक्षात ठेवा कि भ्रस्टाचाराचे आरोप उद्धव ठाकरेंवरही झालेत आणि खुनाचा आरोप आदित्य ठाकरेंवरही झालाय. त्यांची प्रकरणेही मग बाहेर येतील असा इशारा नितेश राणे यांनी दिला आहे.