हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्या ठाण्यातील 11 सदनिका ईडीने जप्त केल्या आहेत. या प्रकरणावरून आता भाजप नेत्यांकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टार्गेट केले जात आहे. दरम्यान भाजप आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे. “जो कायदा बाळासाहेब ठाकरे यांनी मनोहर जोशी यांचा राजीनामा घेऊन लावला होता. तो मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत लावणार का?” असा सवाल राणे यांनी केला.
नितेश राणे यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की,1999 मध्ये हिंदू ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी त्या काली असलेल्या सेनेचे मुख्यमंत्री मनोहर जोशी याच्या जावयावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते. त्यावेळी लगेच बाळासाहेबांनी जोशींचा राजीनामा घेतलेला होता. आता मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे आहेत. आता त्याच्या मेहुण्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहरेत. आणि आता ते सिद्ध झालेले आहेत. चौकशी झालेली नाही. संपत्तीही जप्त झालेली आहे. या कारणावरून मुख्यमंत्र्यानी खरं तर राजीनामाच दिला पाहिजे.
खरं म्हंटले तर महाराष्ट्रातील जनतेला मेहुण्यावरील कारवाई मागील उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिले पाहिजे. या प्रकरणात मेहुणाच आहे काय, मुलगा किव्हा त्यांची पत्नी याचा हस्तक्षेप तर नाही ना याची माहीती मुख्यमंत्र्यानी देणे आवश्यक आहे. कारण कागदपत्रे बोलत आहेत.
ईडीच्यावतीने कारवाई करत अधिकृतपणे संपत्ती जप्त केली आहे. त्यामुळे या संदर्भात मुख्यमंत्र्यानी अधिकृतपणे बोलणे गरजेचे आहे. नुसते त्यांनी गप्प राहून संशय वाढवून काहीही होणार नाही. काय नेमके आहे? नंदकिशोर चतुर्वेदी आहे कि त्याचे मनसुख हिरेन तर केले नाही ना?, ज्या जाधव तर केले नाही नाही याची माहिती तर त्यांनी दिली पाहिजे ना, असे राणे यांनी यावेळी सांगितले.