सिंधुदुर्ग प्रतिनिधी । विधानसभा निवडणुकीची मतमोजणीची प्रक्रिया गुरुवारी सकाळी ८ वाजता सुरु होणार आहे. निवडणूक निकालापूर्वी अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. एकीकडे उमेदवारांमध्ये निकालाची धाकधूक आहे तर, दुसरीकडे आमदारकीच्या या परीक्षेमध्ये कोण पास होणार कोण नापास होणार,हे चित्र उद्या दुपारपर्यंत स्पष्ट होईल. दरम्यान नारायण राणे यांनी आपले पुत्र नितेश राणे निवडून येणार असल्याचं भाकितं केलं.
नितेश पन्नास हजार मताधिक्क्याने निवडून येतील असा विश्वास नारायण राणे यांनी काल माध्यमाशी बोलताना व्यक्त केला. दरम्यान राणेंशी फारकत घेतलेले शिवसेनेचे उमेदवार सतीश सावंत यांनी राणेंच्या या वक्तव्यावर त्यांना प्रतिप्रश्न केला आहे. २०१४ पासून नारायण राणे भाकितं सांगत आहेत, परंतु त्यांनी केलेली भाकितं आजपर्यंत कधी तरी खरी ठरली आहेत का? याचा आढावा त्यांनीच घ्यावा अशी तिखट प्रतिक्रिया सावंत यांनी दिली. मात्र, राणेंनी नितेश यांच्या विजयाचं भाकितं ठरणार का? याची उत्सुकता येथील जनतेला लागली आहे.