अपघात मुक्त भारत हीच विनायक मेटेंना खरी श्रद्धांजली ठरेल : नितीन गडकरी

0
80
Nitin Gadkari Vinayak Mete
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांचे आज पहाटेच्या सुमारास अपघाती निधन झाले. त्यांच्या अपघाताची माहिती मिळताच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दुःख व्यक्त करीत त्यांना श्रद्धांजली वाहिली. “विनायक मेटे हे माझ्या जवळचे मित्र होते. त्यांचे अपघाती निधन झाले हे महाराष्ट्राचे नुकसान आहे. रस्त्यावर अपघात होतात. त्यात लोक मृत्युमुखी पडतात. पण सर्वानी संवेदनशील बनले पाहिजे. अपघात मुक्त भारत हीच विनायक मेटेंना खरी श्रद्धांजली ठरेल,” असे मंत्री गडकरी यांनी म्हंटले.

नागपूर येथे नितीन गडकरी यांनी माध्यमांशी संवाद साधला. ‘विनायक मेटे यांच्या रस्ते अपघाताची घटना हि दुर्दैवी आहे. त्यांचे अकाली जाणे हेमनाला चटका लावणारे आहे. आज महामार्गावर अनेक अपघात होत असतात. त्यात अनेकांना आपले प्राण गमवावे लागतात. आपण सर्वांनी आता प्रवास करताना आपल्या जीवाची काळजी घेतली पाहिजे. प्रवास करताना नियमांचे पालन केले पाहिजे, असे सांगत मंत्री गडकरी यांनी नागरिकांना आवाहन केले.

दरम्यान, मेटे यांच्या अपघाती निधनानंतर अपघाताची सखोल चौकशी केली जात असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर अपघाताच्या चौकशीसाठी आठ पथकांची नेमणूक करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर मेटे यांचे चालक एकनाथ कदम यांची मेडिकल तपासणी केल्यानंतर पोलिसांकडून चौकशी केली जाणार आहे.