हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या काळातील आदर्श होते तर नितीन गडकरी हे आधुनिक काळातील आदर्श आहे असं वादग्रस्त वक्तव्य महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केल्यांनतर राज्यातील राजकारणात त्यांच्या या विधानाचे मोठं पडसाद उमटले. आता खुद्द नितीन गडकरी यांनीच एक व्हिडिओ शेअर करत राज्यपालांना घरचा आहेर दिला आहे. आमच्या आई वडिलांपेक्षादेखील छत्रपती शिवाजी महाराजांवर आमची निष्ठा आहे. कारण त्यांचं जीवन आमचा आदर्श आहे असं गडकरी यांनी या ट्विटमधील व्हिडिओ मध्ये म्हंटल आहे.
शिवाजी महाराज आमचे दैवत आहेत, आमच्या आई वडिलांपेक्षादेखील छत्रपती शिवाजी महाराजांवर आमची निष्ठा आहे. कारण त्यांचं जीवन आमचा आदर्श आहे. यशवंत किर्तीवंत वरदवंत सामर्थ्यवंत जाणता राजा, निश्चयाचा महामेरू बहुत जनांसी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी. डिएड-बिएड कॉलेजमध्ये मिळणारा राजा नव्हता, वेळ पडलीतर आपल्या मुलाला देखील कठोर शिक्षा देणारा राजा होता असे नितीन गडकरी या विडिओ मध्ये म्हणताना दिसत आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज आमचं दैवत. pic.twitter.com/QOe2l7A7tM
— Office Of Nitin Gadkari (@OfficeOfNG) November 21, 2022
राज्यपाल कोश्यारी नेमकं काय म्हणाले ?
औरंगाबाद येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये दिक्षांतर समारंभ पार पडला या कार्यक्रम सोहळ्यात बोलत असताना भगतसिंह कोश्यारी यांनी शिवाजी महाराज हे जुन्या काळातील आदर्श होते असं वादग्रस्त विधान केलं. आम्ही जेव्हा शाळेत असताना आम्हाला आमचे शिक्षक विचारायचे तुमचा आवडता नेता कोण आहे? तेव्हा ज्यांना सुभाषचंद्र बोस आवडायचे, ज्यांना गांधीजी आवडायचे आणि नेहरू आवडायचे ते त्यांची नावे घ्यायची. मात्र तुम्हाला जर कोणी विचारले तर तुम्हाला बाहेर कुठे जाण्याची गरज नाही. इथेच मिळतील तुम्हाला… शिवाजी महाराज तर जुन्या काळातील आहेत. मी आधुनिक काळाबाबत बोलत आहे असं म्हणत आता डॉ. आंबेडकरांपासून ते नितीन गडकरींपर्यंत सर्व आदर्श तुम्हाला मिळतील असं कोश्यारी म्हणाले. त्यांच्या या विधानानंतर महाराष्ट्रात तीव्र पडसाद उमटले.