‘खडसेंच्या मुलाने आत्महत्या केली का खून झाला?’, गिरीश महाजनांच्या वक्तव्याने खळबळ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव : हॅलो महाराष्ट्र – एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन (girish mahajan) यांच्यातील वाद दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांना मुलगा नसल्याचं वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर प्रत्युत्तर देताना गिरीश महाजन यांनी जोरदार पलटवार केला आहे. मला मुलगा नाही, पण दोन मुली आहेत याचा मला आनंद, मात्र खडसेंना मुलगा होता त्याचं काय झालं? खडसेंच्या मुलाने आत्महत्या केली का त्याचा खून झाला हे तपासण्याची गरज असल्याचे गिरीश महाजन (girish mahajan) यावेळी म्हणाले.

खडसे बेभान झाले आहेत
गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंवर टीका करताना खडसेंच्या अनेक ठिकाणच्या भानगडी आहेत, चौकशीमध्ये सबळ पुरावे मिळत असल्याने खडसे अस्वस्थ आहेत. खडसे आजकाल काय बोलतायत त्याचं त्यांना भान राहत नाहीये. ते बेभान झाले आहेत. कधी मला चावट म्हणतात, कधी बदनामी करा म्हणतात. त्यांची परिस्थिती बघता त्यांची मानसिक स्थिती बिघडणं स्वाभाविक आहे. मुख्यमंत्री लेव्हलचा माणूस असताना ते काहीही बोलत आहेत असे गिरीश महाजन (girish mahajan) म्हणाले.

तसेच ‘तुमच्या मागे ईडी लागली, तुमचं कतृत्व तसं होतं. भोसरीमध्ये तुम्ही काय काय केलं हे समोर येतंय, लवकरच अजून येईल. भोसरी प्रकरणात जावई 17 महिने झाले जेलमध्ये आहे, त्याचा जामीन तुम्ही का करत नाही? माझ्यावर खडसेंनी मोक्का लावला हे सांगायची गरज नाही. खडसे, वकील प्रविण चव्हाण, पोलीस अधिकाऱ्यांनी रचलेलं षडयंत्र पेन ड्राईव्हने समोर आलं आहे. आता मला मोक्का लावला त्याची आणि खडसेंची ईडी चौकशी होत आहे. आता दूध का दूध पाणी का पाणी होईल,’ असे गिरीश महाजन (girish mahajan) म्हणाले आहेत.

हे पण वाचा :
महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल
शिंदे- फडणवीसांचा पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्टरस्ट्रोक : घेतले ‘हे’ 9 महत्वाचे निर्णय
Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे ???
सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???|
ICICI Bank कडून FD वरील व्याज दरात वाढ !!!