काँग्रेस मध्ये जाणार का? नाना पटोलेंच्या ऑफरवर गडकरींनी दिले ‘हे’ उत्तर

nana patole nitin gadkari
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काही दिवसांपूर्वीच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी याना काँग्रेस प्रवेशाची ऑफर दिली होती. गडकरींची भाजपमध्ये घुसमट होत असेल तर त्यांनी काँग्रेसमध्ये यावं आम्ही त्यांना पाठिंबा देऊ असं नाना पटोले यांनी म्हंटल होत. त्याबाबत गडकरींना विचारलं असता मी आयुष्यभर माझ्या विचाराप्रमाणे काम करेन, असं उत्तर देत गडकरींनी ही ऑफर फेटाळून लावली आहे.

एका मुलाखतीत बोलताना गडकरी म्हणाले, , मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे. मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक आहे. त्यामुळे माझ्या विचारधारेशी प्रतारणा करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आता मला कुणी आमंत्रण द्यावं किंवा कुणी काय बोलावं? हा त्यांचा प्रश्न आहे. पण जोपर्यंत मी आहे, तोपर्यंत माझी संघटना, माझा पक्ष आणि माझ्या विचारधारेशी माझी कटिबद्धता आहे.

दरम्यान, नाना पटोलेंनी दिलेल्या ऑफर वर भाजप आमदार संजय कुटे यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. नाना पटोले यांची नितीन गडकरींबद्दल बोलण्याची कुवत नाही. काही दिवसांनी नाना पटोले हेच भाजपात येतील. ते सतत इकडून तिकडे आणि तिकडून इकडे करत असतात. त्यामुळे भविष्यात ते पुन्हा भाजपमध्ये येऊ शकतात. मात्र आम्ही त्यांना पक्षात घेणार नाही असं कुटे यांनी म्हटलं.