अजितदादा, मुख्यमंत्र्यांसोबत प्रस्ताव बनवा, नरीमन पॉईंट ते दिल्ली 12 तासात जोडतो; गडकरींचा शब्द

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अजितदादा,तुम्ही फक्त मुख्यमंत्र्यांसोबत प्रस्ताव बनवा, नरीमन पॉईंट ते दिल्ली 12 तासात जोडतो असा शब्द केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिला. पुण्यात आज सिंहगड रोडवरील उड्डाणपुलाचं भूमीपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झालं. यावेळी ते बोलत होते.

नितीन गडकरी म्हणाले, मुंबईतील वरळी- बांद्रा सी लिंकशी इमोशनल नातं आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्त्वात या पुलाची जबाबदारी मला मिळाली. मला खूप शिकायला मिळालं. सी लिंक वसई -विरारपर्यंत न्यायचा माझी इच्छा होती. पण महाराष्ट्राच्या आर्थिक स्थितीमुळे झालं नाही.

मी मुंबई-दिल्ली हायवे बांधतोय, 170 किमी स्पीडने गाडी चालवली, पोटातलं पाणी हललं नाही. 70 टक्के काम पूर्ण झालंय, महाराष्ट्रातील काम राहिलं आहे, जेएनपीटीपर्यंत हा रस्ता नेणार आहे. अजितदादा आपण मागणी केली वसई -विरारपासून वरळीपर्यंत हा रस्ता जोडला तर मी नरीमन पॉईंटवरुन दिल्लीला 12 तासात पोहोचता येईल, असं नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. दिल्लीला नरीमन पॉईंटशी जोडून देण्याचं काम मी नक्की करेन, तुम्ही मुख्यमंत्र्यांशी बोलून प्रस्ताव तयार करा, असं आवाहन नितीन गडकरी यांनी केलं.

Leave a Comment