पुण्यात आता हवेतून गाड्या धावणार; नितीन गडकरींचे मोठं विधान

nitin gadkari
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आज पुण्यामधील चांदणी चौकातील नवीन उड्डाणपुलाचे (Chandni Chowk Flyover)केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरींच्या (Nitin Gadkari) हस्ते लोकार्पण करण्यात आले आहे. यावेळी, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, पालकमंत्री चंद्रकांत पाटीलसह इतर भाजपचे मंत्री उपस्थित होते. यावेळी बोलताना, “पुण्यातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही हवेत चालणाऱ्या गाड्यांची योजना आणणार आहोत” अशी माहिती नितिन गडकरी यांनी दिली.

लोकार्पण कार्यक्रमात गडकरी यांनी पुणेकरांची संवाद साधला. तसेच, “पुण्यात सध्या वाहतूक कोंडीची मोठी समस्या आहे. चांदणी चौकातील कामासाठीसुद्धा वाहतूक कोंडीमुळे बरेच अडथळे आले, तर ही समस्या कायमची सोडण्यासाठी आपण नवी योजना आणणार आहोत. हवेतून चालणाऱ्या बस आपण येथे आणणार असून या स्काय वॉक बसमधून एका वेळेस २५० प्रवासी प्रवास करू शकतात” असं आश्वासन नागरिकांना दिलं.

त्याचबरोबर, “पुण्यात वाहनांची संख्या वाढली असल्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण झाला आहे. आता पुण्यात वाहनांची संख्या वाढवू नका. कारण इथे खूप प्रदूषण झालंय, आपल्याला पेट्रोल डिझेलला देशातून हद्दपार करायचं आहे. त्यामुळे 40 टक्के प्रदूषण कमी होईल.
एकंदरीत पुण्यातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी अनेक योजना आहेत. त्यापैकी रिंग रोडही लवकरच पूर्ण होईल. मेट्रोचे कामही आता शेवटच्या टप्प्यात आहे. त्यामुळे आता आपण स्कायवॉक बसची योजना आणणार आहोत” अशी माहिती देखील गडकरी यांनी यावेळी दिली.

दरम्यान, उड्डाणपुलाच्या लोकार्पण कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील उपस्थिती लावली होती. यावेळी बोलताना त्यांनी, “पुणे महापालिका, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पीएमपीएम यांनाही माझी सूचना आहे की, हे जे वनकार्ड आपण काढलं आहे ते पीएमपीच्या बसला देखील लागू होईल, अशा प्रकारचं हे वनकार्ड झालं पाहिजे. म्हणजे आता या वनकार्डवर आपली मेट्रो आणि बस सिस्टिम एकत्रित चालली पाहिजे” असे म्हणले.