Wednesday, October 5, 2022

Buy now

संजय राठोड यांना मंत्रीपद दिल्यानंतर चित्रा वाघ यांचं ट्विट चर्चेत; म्हणाल्या की…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील शिंदे- भाजप सरकारचा राजभवनावर मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला. यावेळी शिंदे गटातील आमदार संजय राठोड यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले. त्यांनी आज मंत्रिपदाच्या गोपनियतेची शपथ घेतली आहे. त्यावरून भापच्या नेत्या चित्रा वाघ यांनी टीका केली आहे. “पूजा चव्हाणच्या मृत्युला कारणीभूत असणाऱ्या माजी मंत्री संजय राठोडला पुन्हा मंत्रीपद दिलं जाणं, हे अत्यंत दुदैवी आहे,”असे वाघ यांनी म्हंटले आहे.

महाविकास आघाडी सरकारमध्ये असताना पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात संजय राठोड यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. पण आज पुन्हा एकदा त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर भाजप नेत्या वाघ यांनी ट्विट करत राठोड यांच्यावर निशाणा साधला. त्यांनी ट्विटमध्ये म्हणाले आहे की, “संजय राठोड जरी पुन्हा मंत्री झालेला असला तरीही त्याच्या विरुद्धचा माझा लढा मी सुरूचं ठेवलेला आहे. माझा न्याय देवतेवर विश्वास लडेंगे….जितेंगे”, असा इशारा वाघ यांनी दिला आहे.

 

पूजा चव्हाण प्रकरण काय?

ज्या प्रकरणामुळे आमदार संजय राठोड यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. ते प्रकरणही तितकेच गंभीर असे होते. बीडमधील परळी येथील टिक टॉक स्टार पूजा चव्हाण या तरुणीने आत्महत्या केलेली. पूजाने पुण्यात आत्महत्या केली तेव्हा तत्कालीन वनमंत्री संजय राठोड यांच्यावर पूजा चव्हाण या तरुणीच्या मृत्यूप्रकरणी गंभीर आरोप करण्यात आलेले होते. यावेळी पूजा चव्हाणच्या कॉल रेकॉर्डिंगही व्हायरल झाल्या होत्या. त्यातील आवाज संजय राठोड यांचा असल्याचा आरोप केला जात होता. यानंतर संजय राठोड कुटुंबासह नॉट रिचेबल झालेले. पूजा चव्हाण हिचा मृत्यू घातपात नसल्याचा खुलासा पोलिसांनी केल्यानंतर संजय राठोड यांना दिलासा मिळाला होता.