राहुल गांधींच्या पंतप्रधान पदाच्या उमेदवारीवर नितीश कुमार यांची प्रतिक्रिया; म्हणाले की,

Nitish Kumar Congress Rahul Gandhi
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 2024 च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी (Rahul Gandhi) केवळ विरोधकांचा चेहरा नसून ते पंतप्रधानपदाचे उमेदवारही असतील असा मोठा दावा काँग्रेस नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ (Kamal Nath) यांनी काल केला. त्यांच्या दाव्यावर बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.

नितीशकुमार यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “विरोधी पक्षाच्या वतीने राहुल गांधी यांच्या नावावर आम्हाला आपत्ती नाही. विरोधी पक्षांचे नेते एकमेकांशी चर्चा करतील. पक्षाचे कार्यक्रम करणे प्रत्येकाचे काम आहे. ते म्हणाले की, पंतप्रधान पदाचा मी दावेदार नाही. पक्षाच्या कामासोबत आम्हाला काही घेणं-देणं नाही.

माजी मुख्यमंत्री कमलनाथ नेमकं काय म्हणाले?

एका वृत्तसंस्थेला दिलेल्या इंटरव्हिव्ह मध्ये बोलताना माजी मुख्यमंत्री कमलनाथ म्हणाले, 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकांबद्दल सांगायचे तर, राहुल गांधी केवळ विरोधकांचाच चेहरा नसतील तर विरोधी पक्षाकडून पंतप्रधानपदाचे उमेदवारही असतील. जगाच्या इतिहासात भारत जोडो सारखी इतकी मोठी पदयात्रा कोणीही काढली नसेल. राहुल गांधी सत्तेसाठी राजकारण करत नाहीत, तर देशातील जनतेसाठी करतात. तसेच गांधी घराण्याशिवाय इतर कोणत्याही कुटुंबाने देशासाठी इतके बलिदान दिलेले नाही.