हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशभरात अनेक रुग्णांचा ऑक्सिजन अभावी मृत्यू झाल्याचा दावा करण्यात येत असला तरी ऑक्सिजनअभावी महाराष्ट्रात एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही, असा दावा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केला आहे.
राज्यामध्ये ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे लोकांचा मृत्यू झाला आहे असे आम्ही कधीही म्हटलेले नाही. अनेक रुग्ण हे इतर आजारांनी पीडित होते. ऑक्सिजनच्या टंचाईमुळे कुठल्याही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. असे राजेश टोपे यांनी स्पष्ट केले. राज्याकडे उपलब्ध असणारा साठा मर्यादित होता. रात्रीतून गाडी पोहोचली नाही, तर सकाळी ऑक्सिजन मिळणार नाही, अशी परिस्थिती होती पण ऑक्सिजनअभावी कोणाला जीव गमवावा लागला नाही, असं राजेश टोपेंनी म्हटलंय.
केंद्र सरकारने ऑक्सिजन मुळे कोणाचा मृत्यू झाला नसल्याने कोर्टात सांगितले. यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्रावर हल्लाबोल केल्यानंतर भाजप कडून त्यास प्रत्युत्तर देण्यात आले होते. विरोधी पक्षांची सत्ता असलेल्या राज्यातील सरकारांनी दुसऱ्या लाटेमध्ये ऑक्सिजनच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे कुठल्याही रुग्णाचा मृत्यू झाला नसल्याचे कोर्टात सांगितले होते. केंद सरकारने दिलेले उत्तर हे त्याच उत्तरावर आघारित आहे, असे भाजपाने स्पष्ट केले होते.