मुंबई । वाढीव वीज बिल सवलतीबाबत राज्य सरकारने यू टर्न घेतला आहे. लोकांनी वीज वापरली त्याचे बिल भरावे, कुठलीही वीजबिल माफी (Electricity Bill) मिळणार नाही, मीटर रिडींगप्रमाणे आलेली बिलं ग्राहकांनी भरलीच पाहिजेत असं वक्तव्य ऊर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी केलं आहे.
वीज वापरणारे जसे ग्राहक आहेत तसे महावितरणही ग्राहक आहे. महावितरणला बाहेरून वीज विकत घ्यावा लागते, विविध चार्जेस द्यावे लागतात. बिलाचे हप्ते पाडुन देण्यात आले, पूर्ण बिल भरणार्यांना २ टक्के सवलतही दिली आहे. लोकांच्या तक्रारींचे निवारणही आम्ही केले आहे. ग्राहकांना दिलासा मिळावा यासाठी मी पूर्ण प्रयत्न केले, पण केंद्र सरकारने यात मदत केली नाही.
६९ टक्के वीज बिल वसुली पूर्ण झाली आहे, आता सवलतीचा विषय बंद झाला आहे. महावितरण ६९ हजार कोटीच्या तोट्यात आहे, आम्ही आता कर्ज काढू शकत नाही. महावितरणला आता वीज बिल वसुलीचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, महावितरणने वीजबिल वसुलीबाबत परिपत्रक जारी केलं आहे. त्यानुसार डिसेंबर 2020 पर्यंत थकीत वीजबिले भरावी लागणार आहेत. (No electricity bills will be waived Said Nitin Raut)
'लोकांनी मला सलग ६ वेळा निवडून दिले, प्रसाद लाड यांनी जनतेमधून एकदा तरी निवडून दाखवावे'; खडसेंचे चॅलेंज
वाचा सविस्तर-👉 https://t.co/xgR6aVwjDk#HelloMaharashtra @EknathGKhadse @PrasadLadInd @BJP4Maharashtra @NCPspeaks— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) November 17, 2020
भाजपला जास्त मस्ती आली आहे, त्यांना धडा शिकवणारचं; जयसिंगराव गायकवाडांचा निर्धार
वाचा सविस्तर- 👉 https://t.co/TvMKZw5cKz@BJP4Maharashtra @jaysinghraogaikwad @BJP4Maharashtra @NCPspeaks— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) November 17, 2020
समजूत घातली तरी 'ते' पक्ष सोडून गेले, पण आता…., जयसिंगराव गायकवाडांनी भाजप सोडल्यावर पंकजांची प्रतिक्रिया
वाचा सविस्तर-👉 https://t.co/ENKNBwMGR9@Pankajamunde @jaysinghraogaikwad @BJP4Maharashtra #HelloMaharashtra— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) November 17, 2020
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : www.hellomaharashtra.in