महाराष्ट्रात एकही कोरोनाचा रुग्ण नाही, तेव्हा अफवा पसरवू नका!- आरोग्यमंत्री राजेश टोपे

0
26
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रात एकही करोना व्हायरसचा रुग्ण आढळलेला नाही. करोना व्हायरस जगभरात वेगानं फोफावू लागल्यानं अफवांनाही वेग आला आहे. त्यामुळं ठिकठिकाणची सरकारं व प्रशासनाकडून नागरिकांना दिलासा देण्याचे प्रयत्न सुरू आहेत असं निवेदन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज विधान परिषदेत दिलं.

दरम्यान, करोनाच्या संशयित रुग्णांवर उपचार करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात १० बेड स्वतंत्र ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यासोबतच मुंबईत तीन ठिकाणी तपासणी केंद्रं उभारण्यात आली आहेत. वैद्यकीय कर्मचाऱ्यांना करोनाग्रस्तांवर उपचार करण्याचं विशेष प्रशिक्षण देण्यात आलं आहे. तसेच एन-९५ हे मास्क फक्त रुग्णालयातील कर्मचाऱ्यांसाठी आहे सर्वसामान्यांसाठी त्याची गरज नाही, अशी माहितीही टोपे यांनी विधान परिषदेत दिली.

कोरोनाच मूळ प्राणीजन्य पदार्थांमध्ये आहे. करोनामुळं मृत्यू होण्याचं प्रमाण अडीच ते तीन टक्के आहे. लक्षणं ओळखून वेळीच खबरदारी घेण्याची गरज आहे. हातरुमाल वापरणंही पुरेसं आहे. त्यामुळं नागरिकांनी घाबरून जाऊ नये व कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये,’ असं आवाहन आरोग्यमंत्र्यांनी विधान परिषदेत केलं.

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here