हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एखादा नवीन मराठी अथवा हिंदी भाषेतील चित्रपट आला कि तो पहावा असे मोठ्यांप्रमाणे लहान मुलांनाही वाटते. मग मनोरंजनाचा चित्रपट असेल तर घरातील मोठे लहान मुलांनाही सोबत चित्रपट पहायला घेऊन जातात. मात्र, आता हॉलिवूड चित्रपट लहान मुलांनी बघितल्यास त्यांना थेट ६ महिने कारावासाची शिक्षा सिनवली जाणार आहे. याबाबत उत्तर कोरियाचा हुकुमशाह किम जोंग उन यांनी एक आदेश दिला आहे.
आपल्या हटके निर्णयामुळे उत्तर कोरियाचा हुकुमशाह किम जोंग उन नेहमीच चर्चेत असतात. दरम्यान ते आता पुन्हा चर्चेत आले आहे ते म्हणजे त्याच्या आका घेतलेल्या निर्णयामुळे तो म्हणजे हॉलिवूड चित्रपट पाहण्यावर बंदी घालण्याचा होय. उत्तर कोरियात आता एक नवीन कायदा लागू केला आहे. या कायद्यानुसार उत्तर कोरियात मुलांच्या हॉलिवूड चित्रपट बघण्यावर बंदी घालण्यात आली आहे.
किम जोंग उनने लागू केलेल्या कायद्यानुसार जर एखादा मुलगा हॉलिवूड चित्रपट बघताना आढळला तर त्याच्या पालकाला सहा महिने लेबर कॅम्पमध्ये पाठवण्यात येणार आहे. तसेच मुलाला पाच वर्षाच्या तुरुंगवास भोगावा लागणार आहे. हॉलिवूड चित्रपटामुळे मुलं समाजविरोधी बनत असून त्यांच्यावर वाईट संस्कार होतात, असा दावा किम जोंग उनने केला आहे.