आता 30 सप्टेंबरपर्यंत पूर्ण करा ‘ही’ सर्व कामे, अन्यथा कोणतेही व्यवहार करता येणार नाहीत

नवी दिल्ली । इन्कम टॅक्स पासून आधार कार्ड, पॅन कार्ड पर्यंतची अनेक महत्वाची कामे मार्गी लावण्यासाठी या महिन्याची शेवटची तारीख आहे. पैशाशी संबंधित अशी अनेक कामे आहेत, जी तुम्हाला 30 सप्टेंबरपूर्वी पूर्ण करायची आहेत. अन्यथा, तुमचे बँकिंग ते शेअर बाजाराशी संबंधित व्यवहार अडकू शकतील. त्या सर्व महत्त्वाच्या सरकारी कामांबद्दल माहिती घेउयात कि, जी आपल्याला 30 सप्टेंबरपर्यंत पूर्ण करायची आहेत.

1. Income Tax Filling Deadline for AY 2020-21/CBDT :
सरकारने इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबरपर्यंत वाढवली आहे. जर एखाद्या करदात्याने या मुदतीपर्यंत रिटर्न दाखल केले नाही, तर तो रिटर्न दाखल करू शकणार नाही. जर तुमचे आर्थिक वर्षातील एकूण उत्पन्न 5 लाख रुपयांपेक्षा जास्त नसेल, तर तुम्हांला 1,000 रुपये दंड भरावा लागेल.

2. PAN Aadhaar Linking:
केंद्र सरकारने पॅन कार्ड आधार कार्डाशी जोडण्याची अंतिम मुदत 30 जून 2021 ते 30 सप्टेंबर 2021 पर्यंत वाढवली आहे. जर तुम्ही अंतिम मुदतीपर्यंत पॅन आणि आधार लिंक केले नाही तर पॅन कार्ड निष्क्रिय होईल. म्हणजे ते चालणार नाही. अशी लोकं आर्थिक व्यवहार करू शकणार नाहीत जिथे पॅनचा उल्लेख करणे आवश्यक आहे. याशिवाय दंडही भरावा लागेल.

3. Update your KYC in demat account :
भांडवली बाजार नियामक सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) ने गुंतवणूकदारांना डीमॅट आणि ट्रेडिंग खात्यांमध्ये KYC डिटेल्स अपडेट करण्याची मुदत 30 सप्टेंबर 2021 पर्यंत वाढवली आहे. KYC अपडेट न केल्यास गुंतवणूकदार शेअर बाजारात ट्रेड करू शकणार नाहीत. कारण त्यांचे खाते निष्क्रिय मानले जाईल. या प्रकरणात, शेअर ट्रान्सफर करणे शक्य होणार नाही. म्हणून, KYC निर्धारित कालावधीत डीमॅट खात्यात अपडेट करणे आवश्यक आहे.

4. Aadhaar PF Link :
EPF खात्याला आधारशी लिंक करणे आता अनिवार्य झाले आहे. जर एखाद्या व्यक्तीने 1 सप्टेंबरपर्यंत खाते आधारशी लिंक केले नाही तर त्याच्या खात्यात पैसे येणार नाहीत. त्यामुळे आता तुमचे खाते आधारशी लिंक करणे अत्यंत महत्त्वाचे झाले आहे.

5. Update mobile number in your bank accounts :
RBI ने 30 सप्टेंबरनंतर एडिशनल फॅक्टर ऑथेंटिकेशन अनिवार्य केले आहे. 1 ऑक्टोबरपासून तुमच्या डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्डच्या ऑटो डेबिटवर एडिशनल फॅक्टर ऑथेंटिकेशनचे नियम लागू होतील. यामध्ये, वेगवेगळ्या पेमेंटसाठी ग्राहकांची मंजुरी आवश्यक असेल म्हणजेच अनेक युटिलिटी पेमेंटवर ऑटो डेबिट थांबवले जाईल.

You might also like