नागपूर । भाजप नेते आणि राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. अशा वेळी मध्य प्रदेश आणि राजस्थानप्रमाणे महाराष्ट्रातही ऑपरेशन लोटस राबवलं जाणार अशी चर्चा रंगली आहे. त्याबाबत राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांना विचारलं असता, ‘महाराष्ट्र सरकार मजबूत आहे. पुढची ५ वर्ष हे सरकार चालेल. मुख्यमंत्री आणि आमचे अध्यक्ष सगळ्या आमदारांशी संपर्कात आहेत. आपण काळजी करू नका देवेंद्रजीच्या हातात काही लागणार नाही,’ अशी टीका नितीन राऊत यांनी केली आहे.
नागपूर शहर आणि ग्रामीण कायदा सुव्यवस्था येथील परिस्थितीचा आढावा घेतला. या बैठकीला राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुखही हजर होते. उर्जामंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊतही हजर होते. त्यानंतर त्यांना ऑपरेशन लोटसबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी फडणवीसांवर सडकून टीका केली. राजस्थानात जे काही घडलं त्यानंतर महाराष्ट्रातही ऑपरेशन लोटस होण्याची शक्यता नसून दिल्लीला गेलेल्या फडणवीसांना राज्यात कटोरा घेऊन फिरावं लागेल अशी टीकाही नितीन राऊत यांनी केली आहे. दरम्यान, काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी राजस्थानात घोडेबाजार केल्याचा आरोप भाजपने फेटाळून लावले आहेत. तसंच सचिन सावंत यांनी माफी मागावी, अशी मागणीही भाजपने केली आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”