नवी दिल्ली I सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. पीएम किसानच्या रजिस्ट्रेशनमध्ये होणारी फसवणूक टाळण्यासाठी सरकारने आता लाभार्थ्यां कार्ड लिंक करणे बंधनकारक केले आहे. नवीन नियमानुसार रेशनकार्ड क्रमांक आल्यानंतरच पती किंवा पत्नी किंवा त्या कुटुंबातील कोणत्याही एका सदस्याला पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळू शकेल. योजनेअंतर्गत, नवीन रजिस्ट्रेशन करताना रेशनकार्ड क्रमांक देणे बंधनकारक असेल. एवढेच नाही तर कागदपत्राची सॉफ्ट कॉपी तयार करून पोर्टलवर अपलोड करावी लागेल.
रजिस्ट्रेशन करताना हे लक्षात ठेवा
तुम्हाला पंतप्रधान किसान योजनेसाठी पहिल्यांदा रजिस्ट्रेशन करायचे असेल, तर तुम्हाला रेशन कार्ड क्रमांक अपलोड करावा लागेल. नवीन नियमानुसार, खतौनी, आधार कार्ड, बँक पासबुक आणि डिक्लेरेशन लेटरच्या हार्ड कॉपी सादर करणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे योजनेतील फसवणूक कमी होईल.
पुढील महिन्यात हप्ता येईल
पीएम किसान योजनेचा पुढील 11 वा हप्ता एप्रिलमध्ये जारी करण्याचे सरकारने म्हटले आहे. शेतकऱ्यांच्या खात्यावर हप्ते जमा करण्यासाठी सरकारने सर्व व्यवस्था केली आहे. आता योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला लवकरच रजिस्ट्रेशन करावे लागेल.
‘ही’ रक्कम दरवर्षी मिळवा
पंतप्रधान किसान योजनेअंतर्गत देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपये मिळतात. सरकार दरमहा 500 रुपये देत आहे, जे दर चार महिन्यांनी हप्त्याने दिले जाते. तुम्हाला या योजनेचा लाभ अद्याप मिळू शकला नसेल, तर लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करा, जेणेकरुन तुम्हाला एप्रिलमध्ये येणाऱ्या पुढील हप्त्याचा लाभ घेता येईल.