हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारमधील ११ घोटाळेबाजांची नावं जाहीर केली होती. आज सोमय्यांनी नाशिकमध्ये येऊन मोठा राजकीय बॉम्ब टाकला आहे. ईडीच्या लिस्टमधील 12 वा खेळाडू राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड असल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे. त्यामुळे ईडीची पुढची नोटीस आव्हाडांना येणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नाशिक येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना ईडीच्या लिस्टमधील 12 वा खेळाडू कोण आहे? असा सवाल सोमय्यांना करण्यात आला. त्यावर लिस्टमधला 12वा खेळाडू जितेंद्र आव्हाड आहे, असं मोठं विधान सोमय्या यांनी केलं आहे. तसेच यावर अधिक बोलणं त्यांनी टाळलं.
दरम्यान सध्या ईडीच्या ससेमिऱ्यात अडकलेले परिवहन मंत्री अनिल परब यांच्याविरोधात पहिली तक्रार मीच दिली होती असेही सोमय्या यांनी सांगितले. परब यांच्या मर्जीतील अधिकारी बजरंग खरमाटे यांचीही चौकशी सुरू आहे, असं सांगतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अनिल देशमुख यांना लपवून ठेवेले. असा आरोप त्यांनी केला.