नवी दिल्ली । ट्विटरने आपल्या कर्मचाऱ्यांना भेट दिली आहे. ट्विटरचे प्रमुख पराग अग्रवाल यांनी शुक्रवारी अनेक ट्वीट्स करत जाहीर केले की, सोशल नेटवर्किंग कंपनी या महिन्यात त्यांचे जागतिक कार्यालय पुन्हा सुरू करणार आहे. जर लोकांना ऑफिसमधून काम करायचे असेल तर ते करू शकतात, मात्र जर त्यांना Work From Home किंवा Work From Anywhere करायचे असेल तर हे पूर्णपणे कर्मचाऱ्यांच्या इच्छेवर अवलंबून असेल.
मात्र, पराग अग्रवाल यांनी कर्मचार्यांना ऑफिसमध्ये परतण्याचे आवाहन करताना सांगितले की, ऑफिसमध्ये काम करण्याची जोमदार संस्कृती निर्माण होईल आणि बिझनेस ट्रॅव्हलही तातडीने सुरू होईल. ते म्हणाले की,” 15 मार्चपासून सर्व जागतिक ट्विटर ऑफिस उघडतील.” ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल यांनी ट्विटमध्ये लिहिले की, “कुठे काम करायचे, तुम्हाला व्यवसायासाठी सुरक्षितपणे प्रवास करायचा आहे की नाही, किंवा कोणत्या कार्यक्रमाला उपस्थित राहायचे हे सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून आहे.”
तुम्हाला जिथून बरे वाटेल तिथून काम करा
Twitter CEO कर्मचार्यांना जिथे जास्त प्रोडक्टिव्ह आणि क्रिएटिव्ह वाटत असेल तिथे काम करायला सांगतात. ते पुढे म्हणाले की,” यामध्ये फुलली “वर्क फ्रॉम होम (WFH) ” पर्यायाचा देखील समावेश आहे.” पराग अग्रवाल यांनी जोर दिला की, ज्यांना रिमोटली काम करणे सुरू ठेवायचे आहे त्यांनी “Learn and Adapt”शी जुळवून घेणे आवश्यक आहे, कारण “वेगवेगळ्या ठिकाणांहून काम करणे जास्त अवघड होईल.”
जग COVID-19 साथीच्या आजाराशी झुंजत असताना, ऑफिसमध्ये परत येण्याची शक्यता कमी होती. मात्र, परिस्थिती आता पूर्वपदावर आल्याने, Google एप्रिलच्या सुरुवातीस आपले सिलिकॉन व्हॅली ऑफिस कर्मचार्यांसाठी उघडण्याच्या तयारीत आहे. Google ला अपेक्षा आहे की, त्यांचे कर्मचारी आठवड्यातून फक्त 2 दिवस घरून आणि उर्वरित दिवस ऑफिसमधून काम करतील.