नवी दिल्ली । इनकम टॅक्स रिटर्न दाखल (IT return file) करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. आता IT रिटर्न भरणे सोपे होईल, कारण इंडिया पोस्ट (Post Office) आता आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिसच्या कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये (Post Office, CSC) काऊंटरवर ITR दाखल करण्याची सुविधा देत आहे. इंडिया पोस्टने या बद्दल आधीच घोषणा केली आहे. देशभरातील लाखो पगारदार करदात्यांसाठी ही मोठा दिलासा देणारी आणि चांगली बातमी आहे.
इंडिया पोस्ट काय म्हणाले ते जाणून घ्या
इंडिया पोस्टने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर म्हटलं आहे की, आता तुम्हांला तुमचा ITR दाखल करायला फार दूर जाण्याची गरज नाही कारण तुम्ही तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस CSC काऊंटरवर सहजपणे ITR दाखल करू शकता.
ITR कसा भरायचा ते जाणून घ्या
पोस्ट ऑफिसचा CSC काउंटर संपूर्ण देशातील लोकांसाठी एक सिंगल एक्सेस पॉईंट म्हणून काम करतो. पोस्टल बँकिंग आणि विमा संबंधित विविध सेवा एकाच विंडोवर उपलब्ध आहेत. एखाद्या व्यक्तीला विविध सरकारी योजनांशी संबंधित माहिती आणि पोस्ट ऑफिसच्या CSC काउंटरकडून लाभ मिळू शकतात. त्याखेरीज भारत सरकार भारतीय नागरिकांना सुविधाही देऊ शकते. डिजिटल काउंटर कार्यक्रमांतर्गत विविध ई-सेवा उपलब्ध आहेत.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा
Click Here to Join Our WhatsApp Group