हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजच्या काळात, आधार कार्ड अनेक मार्गांनी प्रत्येकासाठी एक महत्त्वपूर्ण डॉक्युमेंट बनला आहे. शाळांमधील मुलांच्या प्रवेशापासून ते अनेक सरकारी योजनांसाठी आधार कार्ड मागितले जातात. याशिवाय ओळखपत्रांसाठीही आधार कार्डचा वापर केला जातो. पूर्वी आधार कार्ड पोस्टद्वारे पाठविले जात असे. परंतु, आता आपल्याला आधार कार्ड नवीन स्वरूपात दिसणे सुरू होईल. या नव्या प्रकारच्या आधारविषयी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आता देखभाल दुरुस्तीसाठी ते सोयीचे होईल. आधार तयार करणारी संस्था UIDAI ने याबाबत माहिती दिली आहे.
UIDAI ने कळविले आहे की, आता पॉलिव्हिनाईल क्लोराईड (PVC) कार्डवर आधार कार्ड पुन्हा छापले जाऊ शकते. हे कार्ड आपल्या एटीएम किंवा डेबिट कार्ड प्रमाणेच आपल्या वॉलेटमध्ये सहजपणे येईल. तसेच, ते खराब होण्याची चिंताही राहणार नाही. UIDAI ने एका ट्विटमध्ये लिहिले आहे की, ‘तुमचे आधार आता सोयीस्कर स्वरूपात असेल जो तुम्ही सहजपणे वॉलेटमध्ये ठेवू शकता.’
या ट्विटमध्ये पुढे सांगण्यात आले की, आपण आपले आधार PVC कार्ड मागवू शकता. हे टिकाऊ आहे, दिसण्यात आकर्षकही आहे आणि लेटेस्टे सिक्योरिटी फीचर्सने सुसज्ज आहे. त्याच्या सिक्योरिटी फीचर्समध्ये होलोग्राम, गिलोच पॅटर्न, घोस्ट इमेज आणि मायक्रोटेक्स्ट समाविष्ट असेल.
पीव्हीसी कार्ड पॉलीविनाईझ क्लोराईड कार्ड म्हणून ओळखले जाते. हे एक प्रकारचे प्लास्टिक कार्ड आहे, ज्यावर आधार कार्डची माहिती छापली जाते. हे कार्ड बनवण्यासाठी तुम्हाला 50 रुपये द्यावे लागतील.
नवीन आधार PVC कार्ड कसे मिळू शकेल?
- यासाठी UIDAI वेबसाइटवर ऑनलाईन अर्ज करावा लागेल.
-
या वेबसाईटवर ‘My Aadhaar’ सेक्शनमध्ये जाऊन ‘Order Aadhaar PVC Card’ वर क्लिक करा.
-
यानंतर तुम्हाला 12 अंकी नंबर किंवा 16 अंकी व्हर्च्युअल आयडी किंवा 28 अंकी आधारचा आधार एनरोलमेंट आयडी (EID) भरावा लागेल.
-
यानंतर तुम्हाला सिक्योरिटी कोड किंवा कॅप्चा भरावा लागेल.
-
ओटीपी साठी Send OTP पाठवा क्लिक करा.
-
त्यानंतर रजिस्टर्ड मोबाइलवर ओटीपीला देण्यात आलेली रिक्त जागा भरा आणि ती सबमिट करा.
-
सबमिशन केल्यानंतर, तुम्हाला आधार पीव्हीसी कार्डचे प्रीव्यू मिळेल.
-
यानंतर तुम्हाला खाली दिलेल्या पेमेंट पर्यायावर क्लिक करावे लागेल. यानंतर आपल्याला पेमेंट पेजवर पाठविले जाईल. आपल्याला येथे 50 रुपये फी जमा करावी लागेल.
-
पेमेंट दिल्यानंतर, आपल्या आधार पीव्हीसी कार्डची ऑर्डर प्रक्रिया पूर्ण होईल.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.