हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राष्ट्रवादी काँग्रेसचे पारनेरचे आमदार निलेश लंके आणि तहसिलदार ज्योती देवरे यांच्यातील वाद चांगलाच चर्चेत आहे. अहमदनगरमधील पारनेरच्या महिला तहसीलदार ज्योती देवरे यांनी लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांकडून त्रास दिला जात असल्याचा आरोप करत आत्महत्या करण्याचा इशारा दिला होता. याबाबत त्यांची एक सुसाईट ऑडिओ क्लीप व्हायरल झाली होती. पारनेरचे आमदार निलेश लंके यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप महिला तहसीलदार यांनी केले होते.
यानंतर भाजपनेही यात आक्रमक पवित्रा घेत आमदार निलेश लंकेंच्या चौकशीची मागणी केली होती. चित्रा वाघ यांनी तहसिलदार ज्योती देवरे यांची बाजू घेत बाजू लावून धरली होती. नुकताच निलेश लंके आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी एकाच विमानातून प्रवास केल्याचा एक फोटो सोशल मिडियात व्हायरल होतोय. तसेच या भेटदरम्यान फडणवीस यांच्यासमोर लंके यांनी आपली बाजू मांडल्याचं बोललं जातंय. यानंतर देवरे प्रकरणात भाजपने दोन पावले माघार घेतल्याची चर्चा आहे.
मात्र, ओ….लंके! 2 पावले माघार नाही तर 200 पाऊले पुढे जात ठोकणारे..लक्षात ठेवा असं म्हणत चित्रा वाघ यांनी भाजपची भुमिका स्पष्ट केलीय. कमाल आहे…..आमचे नेते देवेंद्रजींसोबत फोटो काढून लगेच भाजपची दोन पावले माघार ची बातमी छापून आणलीत. ओ….लंके, ते आमचे नेते देवेन्द्रजी आहेत दोन पावले माघार घेतं नाही तर २०० पाऊले पुढे जात ठोकणारे….हे ध्यानात ठेवा असं म्हणत ज्योतीताई देवरेच्या मागे आम्ही सगळे सक्षमतेने उभे आहोत अशा आशयाचे ट्विट चित्रा वाघ यांनी केलेय.
कमाल आहे…..आमचे नेते @Dev_Fadnavis जी सोबत फोटो काढून लगेच भाजपची दोन पावले माघार ची बातमी छापून आणलीत…
ओ….लंके
ते आमचे नेते देवेन्द्रजी आहेत दोन पावले माघार घेतं नाही तर २०० पाऊले पुढे जात ठोकणारे….
हे ध्यानात ठेवाज्योतीताई देवरेच्या मागे आम्ही सगळे सक्षमतेने उभे…👍👍 pic.twitter.com/5QSTz1LIj7
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) August 25, 2021
नेमकं प्रकरण काय?
अहमदनगरमधील महिला तहसीलदार ज्योती देवरे यांनी लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांकडून त्रासा दिला जात असल्याचा आरोप करत आत्महत्या करण्याचा इशारा दिला होता. याबाबत त्यांची एक सुसाईट ऑडिओ क्लीप व्हायरल झाली होती. पारनेरचे आमदार निलेश लंके यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप महिला तहसीलदार यांनी केले होते. त्यानंतर आमदार निलेश लंके यांनी “संबधित महिला तहसीलदार यांच्यावर काही दिवसांपूर्वीच गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप लावण्यात आले आहेत. ज्यातून सुटण्यासाठी त्यांनी हा एक केविलवाना प्रयत्न केला आहे,” अशी प्रतिक्रिया देत सर्व आरोप फेटाळून लावले होते.