Wednesday, October 5, 2022

Buy now

सुप्रीम कोर्टाकडून मध्यप्रदेशात ओबीसी आरक्षणाला हिरवा कंदील ; निवडणूक आयोगाला ‘हे’ दिले आदेश

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या सुप्रीम कोर्टाकडून देशात ज्या ज्या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्या ठिकाणी त्या निवडणुका कधी घ्याव्यात याबाबत निर्णय दिला जात आहे. आज सुप्रीम कोर्टाने मध्यप्रदेशात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षणाला परवानगी दिली असून ओबीसी आरक्षणाला हिरवा कंदील दिला आहे. तसेच मध्यप्रदेश निवडणूक आयोगाला एका आठवड्यात निवडणुका घ्या, असा आदेशही दिला आहे.

मध्यप्रदेशातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. यावेळी सुप्रीम कोर्टाने ओबीसी आरक्षणाला परवानगी देताना एका आठवड्याच्या आत निवडणुकांची अधिसूचना जारी करण्याचे देखील सांगितले. हे करताना 50 टक्क्यांच्या मर्यादेचे पालन व्हावे असेही कोर्टाने म्हंटले आहे.

10 मे रोजी सुप्रीम कोर्टाने मध्य प्रदेशातील निकाल ओबीसी आरक्षणाविना करण्याचे आदेश दिले होते. मात्र या निर्णयावर दाखल संशोधन याचिकेवर सुनावणी करताना कोर्टाने ओबीसी आरक्षणाला हिरवा कंदील दिला आहे. मात्र, महाराष्ट्र राज्य सरकारच्या बाजूने सुप्रीम कोर्टाने निर्णय न दिल्यामुळे राज्यातील राजकीय नेत्यांकडून एकमेकांवर निशाणा साधला जात आहे.