हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सर्वात मोठी इलेक्ट्रिक टू-व्हीलर बनवणारी कंपनी असलेल्या Ola ने या वर्षाच्या “डिसेंबर टू रिमेंबर” नावाने एक उत्तम ऑफर सुरु केली आहे. आजच्या या बातमीमध्ये आपण कंपनीकडून देण्यात येणाऱ्या या ऑफर्सबाबतची माहिती जाणून घेणार आहोत.
“डिसेंबर टू रिमेंबर” या ऑफर बाबत जाणून घ्या
हे लक्षात घ्या कि, “डिसेंबर टू रिमेंबर” या ऑफर अंतर्गत Ola कडून 31 डिसेंबर 2022 पर्यंत नवीन स्कूटरच्या खरेदीवर आकर्षक ऑफर दिली जाते आहे. या ऑफर अंतर्गत ग्राहकांना एका वर्षासाठी फ्री सर्व्हिसिंग आणि हायपरचार्ज नेटवर्कवर फ्री चार्जिंग दिली जाणार आहे.
झिरो डाउन पेमेंटचा पर्याय उपलब्ध
याव्यतिरिक्त कंपनीकडून नवीन स्कूटर खरेदीसाठी झिरो डाउन पेमेंटचा पर्याय देखील दिला आहे. यासोबतच कंपनीकडून क्रेडिट कार्ड पेमेंटवर 8.99% व्याजासहीत फक्त 2499 रुपयांचा ईएमआय, झिरो प्रोसेसिंग फी तसेच अतिरिक्त सवलत देखील मिळणार आहे.
फ्री मध्ये मिळणार स्कूटर
याशिवाय, Ola च्या ग्राहकांना रेफरल प्रोग्रॅम रिवॉर्ड्स अंतर्गतही लाभ घेता येईल. तसेच कंपनीने त्यांच्या ओला एक्सपीरियन्स सेंटरवर आयोजित रेफरल स्पर्धेतील विजेत्यांना 10 फ्री S1 प्रो स्कूटर देण्याची योजना आखली आहे. मात्र, नुकत्याच लाँच झालेल्या S1 Air वर खास सवलत दिली जाणार नाही.
किंमत जाणून घ्या
Ola कडून सध्या भारतीय बाजारात एस वन, एस वन एअर आणि एस वन प्रो या तीन स्कूटर विकल्या जातात. दिवाळीपूर्वीच कंपनीने आपली सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर S One Air 84,999 रुपयांमध्ये लॉन्च केली होती. कंपनीच्या म्हणण्यानुसार, Ola S One Air साठीची बुकिंग फेब्रुवारी 2023 मध्ये सुरू होईल. मात्र एप्रिल 2023 पासून त्याची डिलिव्हरी सुरू होण्याची अपेक्षा आहे.
हे लक्षात घ्या कि, Ola कडून ऑक्टोबरच्या अखेरीस सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर S1 Air लाँच करण्यात आली होती. S1 Air साठीची किंमत 84,999 रुपये, S1 साठीची किंमत 99,999 रुपये आणि S1 Pro साठीची किंमत 1.40 लाख रुपये (सवलतीशिवाय) आहे. FAME सबसिडीनंतर सर्व किंमती एक्स-शोरूम आहेत.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://olaelectric.com/offers
हे पण वाचा :
FD Rates : ‘या’ दोन बँका ज्येष्ठ नागरिकांना FD वर देत आहेत 9% पेक्षा जास्त व्याज
Gold Price Today : सोन्या-चांदीचे दर घसरले, जाणून घ्या आजचे नवे दर
IDBI Bank मध्ये हिस्सेदारीसाठी ‘या’ 3 कंपन्यांनी दाखविला रस, शेअर्सने गाठली 52 आठवड्यांची सर्वोच्च पातळी
Renault India : नवीन वर्षात वाढणार गाड्यांची किंमत; Car Loan ही होणार महाग
आता घरबसल्या अशा प्रकारे दुरुस्त करा Pan Card मधील चुका