कोरोनापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी ऑलिम्पिक पदक विजेता ब्लॅकने भारतीयांसमोर जोडले हात म्हणाला,”…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

किंगस्टन । जमैकाच्या वेगवान धावपटू योहान ब्लॅकने (Yohan Blake) कोविड -19 (Covid-19) च्या साथीच्या दुसर्‍या लाटेशी झुंज देत असलेल्या भारतीयांना सुरक्षित राहण्यासाठी जे काही शक्य आहे ते करण्याचे आवाहन केले आहे. ब्लॅक हा 2011 मध्ये 100 मीटर वर्ल्ड चॅम्पियन आणि क्रिकेट चाहता आहे. तो रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज टी 20 स्पर्धेचा राजदूत आहेत. गेल्या वर्षी ब्लॅकने भारताला भेट दिली होती.

ब्लॅकने ट्विट करत म्हंटले की,” मला यावेळी भारताबद्दल असलेले माझे प्रेम दाखवायचे आहे. मी हात जोडून प्रत्येकासाठी प्रार्थना करतो की, कृपया सुरक्षित राहण्यासाठी आपल्याला जे सर्वकाही करता येईल ते करा. मला माहित आहे की, हे अवघड आहे परंतु कल्पना करा जर आपण हे एकत्रितपणे केले तर…”

ब्लॅक हा क्रिकेटचा चाहता आहे
तो पुढे म्हणाला की,”मी अनेक वर्षांपासून क्रिकेट पहात आहे. मला या देशाबद्दल प्रेम आहे. इथली लोकं खूप चांगली आहेत. ब्लॅकने 100 मीटर आणि 200 मीटर वैयक्तिक प्रकारात लंडन ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकले आहे. भारत सध्या कोविड -19 साथीशी लढा देत आहे. दररोज तीन लाखाहून अधिक पॉझिटिव्ह प्रकरणे समोर येत आहेत. ब्लॅक व्यतिरिक्त जगातील आघाडीचे वेगवान गोलंदाज ब्रेट ली आणि पॅट कमिन्स हे क्रिकेटपटूदेखील भारतीयांना मदत करण्यासाठी पुढे आले आहेत.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment