हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| 22 जानेवारी रोजी अयोध्येत पार पडणारा राम मंदिराचा उद्घाटन सोहळा देशभरात साजरी केला जाणार आहे. या सोहळ्यानिमित्त वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांमध्ये नागरिकांना सहभागी होता यावे, यासाठी राज्य सरकारने सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. मुख्य म्हणजे, यादिवशी मुंबईचे डबेवाले देखील सुट्टीवर असणार आहे. याबाबतची माहिती एक परिपत्रक जारी करून देण्यात आली आहे.
डबेवाला संघटनांनी या परिपत्रकात म्हटले आहे की, सोमवारी म्हणजेच 22 जानेवारी रोजी मुंबईचे डबेवाले सुट्टीवर असणार आहे. आयोध्यात होणाऱ्या सोहळ्याची सुरुवात ग्रँड रोड येथे श्री सत्यनारायणाची महापूजा, आरती, भजन, महाप्रसाद आणि कीर्तनाने करण्यात येणार आहे. मुंबईतील समस्त डबेवाला कामगारांमध्ये या कार्यक्रमांसाठी उत्साह दिसून येत आहे. सोमवारी मुंबई डबेवाल्यांच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच, माहिम येथे पूरातन काशी विश्वनाथ मंदिरात महाआरती, कलशपूजन, शोभायात्रा, तसेच दिंडी सोहळा सामूहिक हनुमान चालिसा पठण करण्यात येणार आहे. सर्व डबेवाले कामगार वर्ग आणि मंडळ ट्रस्ट या भव्य सोहळ्यासाठी सज्ज झाले आहेत. यानिमित्ताने सर्व मुंबई डबेवाले एक दिवसाची सार्वजनिक सुट्टी घेत आहेत.
दरम्यान, सोमवारी अयोध्यामध्ये राम मंदिराचा लोकार्पण सोहळा आणि रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या थाटात पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून जोरदार तयारी करण्यात येत आहे. अखेर हा क्षण जवळ आल्यामुळे राम भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. तसेच, यानिमित्ताने मुंबईमध्ये देखील भाजप, किर्तन, रामायण पठण असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. आता मुंबईच्या डबेवाल्यांनी देखील सोमवारी सुट्टी घेतल्यामुळे त्यांना या कार्यक्रमात सहभागी होता येणार आहे.