औरंगाबाद – केंद्र सरकारने काल पासून 15 ते 18 वर्षाच्या तरुणांना कोरणा प्रतिबंधक लस देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार औरंगाबादेतही कालपासून लसीकरण मोहिमेला सुरुवात करण्यात आली. पहिल्याच दिवशी जिल्ह्यात तब्बल 6 हजार 194 मुलांचे लसीकरण करण्यात आले. या योजनेचा प्रारंभ पालक मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते गारखेडा येथील प्रियदर्शनी विद्यालयात करण्यात आला.
यावेळी आमदार अंबादास दानवे, संजय शिरसाठ, माजी महापौर नंदकुमार घोडेले, माजी उपमहापौर स्मिता घोगरे, मनपा प्रशासन अस्तिक कुमार पांडेय, अतिरिक्त आयुक्त बि. बि. नेमाने, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा, शिक्षणाधिकारी रामनाथ थोरे, सांस्कृतिक अधिकारी संजीव सोनार यांची उपस्थिती होती. प्रास्तविक प्रशासन पांडे यांनी केले. कमीत कमी वेळेत 15 ते 18 वर्षे वयोगटातील तरुणांचा लसीकरण पूर्ण करण्यात येईल. त्यावेळी प्रियदर्शनी शाळेतील 40 विद्यार्थ्यांना लस देण्यात आली.
शहरातील लसीकरण –
एसबीओ शाळा – 534
अंबिका नगर आरोग्य केंद्र – 118
मेल्ट्रॉन हॉस्पिटल -42
प्रियदर्शनी विद्यालय – 40
राजनगर आरोग्य केंद्र – 115
क्रांती चौक आरोग्य केंद्र – 219