बाळासाहेब थोरात यांच्या राजीनाम्यावर पृथ्वीराज चव्हाण म्हणाले…

Prithviraj Chavan with Balasaheb Thorat
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी
राज्यात काॅंग्रेस अंतर्गत वाद आता चांगलाच गाजू लागला आहे. नाशिक पदवीधर निवडणुकीपासून सुरू झालेला वाद सुरू झालेला असून चांगलाच पेटलेला आहे. बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस विधीमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिला आहे. यावर काॅंग्रेसचे जेष्ठ नेते आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

आ.पृथ्वीराज चव्हाण हे कराड येथे शासकीय विश्रामगृहात माध्यमांशी बोलत होते. त्यावेळी ते म्हणाले, बाळासाहेब थोरात यांनी राजीनामा दिला, याविषयी मला माहिती नाही. मात्र,
नाशिक पदवीधर मतदार संघातील काँग्रेसची हक्काची जागा होती. ती आता असणार नाही. त्यामुळे विधान परिषदेतील काँग्रेसचे संख्याबळ एकने कमी होणार आहे. सदरची गोष्ट गंभीर आहे आणि त्याची चौकशी वरिष्ठांकडून होत आहे. तसेच पक्षाचे प्रभारी एच. के. पाटील यांच्या समवेत 15 तारखेच्या बैठकीत सविस्तर चर्चा होईल. बाळासाहेब थोरात यांनी अन्याय झाला आहे, असे म्हटले असेल तर हाय कमांड या प्रकरणाची चौकशी करेल.

भाजपामध्ये निम्मे आमदार काॅंग्रेसचेच ः आ. पृथ्वीराज चव्हाण
बाळासाहेब थोरात यांच्या राजीनामा देण्यामागे भाजपाचा हात आहे का? ते भाजपाच्या वाटेवर असतील असं वाटतं का? या माध्यमांच्या प्रश्नांवर पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, भाजपचा हात प्रत्येक गोष्टीमध्ये हात असतो. भाजपला स्वतःच्या ताकदीवर काही मिळवता आले नाही. त्यामुळे काँग्रेसमधील माणसे किती फुटतात तेवढे ते फोडत असतात. भाजपमध्ये आमदारांच्या संख्याबळ बघितलं तर निम्मी माणसे ही काँग्रेसचीच आहेत.