हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मराठा आरक्षणप्रश्नावरून सध्या राजकारण चांगलंच तापलं आहे. छत्रपती संभाजीराजे यांनी तर आरक्षणप्रश्नी मोर्चाच काढण्याचा इशारा दिला आहे. त्याबाबत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मत व्यक्त केले.” मराठा आरक्षणप्रश्नी आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे आम्ही हात जोडून विंनती केली आहे. आता तेच निर्णय घेणार आहेत. मात्र, जाणीवपूर्वक महाराष्ट्रात मोर्चा काढून वातावरण गढूळ करण्याचे काम केले जात आहे. एक लाख मराठा मोर्चा दिल्लीवर धडकायला हवा,” असे राऊत म्हणाले.
भाजपकडून महाविकास आघाडी सरकारवर आरक्षण प्रश्नावरून टीका केली जात आहे. राज्य सरकारकडूनही मराठा समाजबांधवांना आरक्षण मिळवून देण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. याबाबत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज नाशिक येथे पत्रकार परिषद घेत माहिती दिली. यावेळी राऊत यांनी मराठा आरक्षणप्रश्नी काढण्यात येत असलेल्या मोर्चांबाबत मत व्यक्त केले.
राऊत म्हणाले,” मराठा आरक्षणप्रश्नी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी झालेल्या भेटीवेळी सुमारे एक तास ४५ मिनिटे शिष्टमंडळाने मराठा आरक्षणप्रश्नी सर्च केली आहे. मराठा आरक्षण प्रश्नी झालेल्या चर्चेवेळी, आम्ही लक्ष घालतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे. त्यामुळे आरक्षणाचा प्रश्न पंतप्रधान मोदी लवकरच सोडवतील असे वाटते.”