हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Online Banking : सध्याच्या डिजिटल काळात जवळपास प्रत्येकाकडून पैसे ट्रान्सफर करण्यासाठी इंटरनेट बँकिंग किंवा UPI चा वापर केला जातो. अशा परिस्थितीत जर कधी चुकून पैसे दुसऱ्याच खात्यामध्ये ट्रान्सफर केले गेले तर ते परत मिळवण्यासाठी फार खटाटोप करावी लागते. मात्र, अनेकदा योग्य ती खबरदारी घेऊनही एका छोट्याशा चुकीमुळे आपले पैसे चुकीच्या खात्यामध्ये ट्रान्सफर केले जातात.
अशा प्रकारच्या ट्रान्सझॅक्शनबाबत RBI कडून आपला Ombudsman Schemes 2021-22 रिपोर्ट जारी करण्यात आला आहे. ज्यामध्ये चुकीच्या खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर झाल्याच्या तक्रारींबाबतची माहिती देण्यात आली आहे. हे जाणून घ्या कि, 2021-22 मध्ये अशा चुकीच्या ट्रान्सझॅक्शनपैकी 6.01 टक्के पैसे परत करता आलेले नाहीत. यामुळे आज आपण चुकीच्या खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर झाले तर ते परत मिळवण्यासाठी काय करावे लागेल याची माहिती जाणून घेउयात…
बँकेला लवकरात लवकर माहिती द्या
जर कधी आपल्याकडून चुकून एखाद्या दुसऱ्या खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर झाले तर लवकरात लवकर याची माहिती आपल्या बँकेला द्यावी. यासाठी कस्टमर केअरला कॉल करता येईल. यावेळी बँकेने विचारलेली सर्व माहिती द्यावी लागेल. सहसा बँकेकडून ट्रान्सझॅक्शनची तारीख, वेळ, खाते क्रमांक इत्यादी माहिती विचारली जाते. Online Banking
चुकीचा खाते क्रमांक असेल तर काय करावे ???
आपल्याकडून ट्रान्सझॅक्शन करताना चुकीचा खाते क्रमांक टाकला गेला असेल तर बँकेकडून काही वेळानंतर ही रक्कम आपल्या खात्यामध्ये परत पाठविली जाईल. तसेच जर तक्रार करूनही पैसे मिळाले नाही तर बँकेमध्ये जाऊन शाखा व्यवस्थापकाशी संपर्क साधा. त्यांना आपली समस्या सांगा आणि पैसे कुठे अडकले आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा. अशा प्रकारे आपल्याला योग्य माहिती मिळेल. Online Banking
जर पैसे दुसऱ्याच्या खात्यामध्ये गेले असतील तर ???
आपल्याकडून ऑनलाइन पैसे ट्रान्सफर करताना जर चुकीचा खाते क्रमांक टाकला गेला असेल तर ते पैसे परत मिळण्यास थोडा वेळ लागू शकेल. याबाबत ताबडतोब बँकेला कळवा. यानंतर बँकेकडून ज्याच्या खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर केले गेले आहेत त्या व्यक्तीशी संपर्क साधला जाईल. यानंतर सदर व्यक्तीच्या संमतीनंतर बँकेकडून आपले पैसे परत केले जातील. मात्र अशा प्रकरणांचा निकाल लागण्यासाठी 2 महिन्यांचा कालावधी लागू शकतो. Online Banking
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://retail.onlinesbi.sbi/retail/login.htm
हे पण वाचा :
FD Rates : ग्राहकांना बँकांकडून मिळाली नवीन वर्षाची भेट, FD वर देत आहेत जबरदस्त ऑफर
Doorstep Banking म्हणजे काय ??? त्याचा फायदा कोणाकोणाला मिळेल ते जाणून घ्या
LIC च्या ‘या’ योजनेमध्ये गुतंवणूक करून मिळवा दरमहा 11,000 रुपयांची पेन्शन
Stock Tips : नवीन वर्षात ‘या’ कंपन्यांच्या शेअर्समध्ये पैसे गुंतवून मिळवा मोठा नफा
‘या’ Penny Stock ने गेल्या 20 महिन्यांत गुंतवणूकदारांच्या भांडवलात केली 150 पटींनी वाढ