अवघ्या काही मिनिटांत प्राध्यापकाची दीड लाख रुपयांनी ऑनलाईन फसवणूक

Facebook Fraud
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – क्रेडिट कार्टची लिमिट वाढवण्याच्या नावाखाली आलेल्या लिंकवर माहिती भरताच एका मुख्याध्यापकाच्या खात्यातून 1 लाख 45 हजार 662 रुपये अवघ्या काही मिनिटात गायब झाले. मात्र, सायबर क्राईमच्या तत्परतेने ही रक्कम भामट्याच्या खात्यात परत मिळवण्यात पोलिसांना यश आले आहे.

याविषयी अधिक माहिती अशी की, शहरातील रहिवासी मुख्याध्यापक राजेंद्र कहाटे यांनी होम लोन घेतल्याने त्यांच्या खात्यावर मोठी रक्कम जमा झाली होती. त्याचवेळी त्यांना केवायसी करुन क्रेडीट कार्डची लिमिट वाढवून देण्यासाठी मेसेज आला. त्यांना लोनची रक्कम इतर ठिकाणी द्यावयाची असल्याने त्यांना क्रेडीट कार्डची लिमीट वाढवावी वाटली, त्यामुळे त्यांनी आलेल्या लिंकवर क्लिक करुन माहिती भरली, त्यानंतर लिमिटतर वाढलीच नाही मात्र उलट त्यांच्याच खात्यातील १ लाख ५४ हजार ५५५ रुपये काढल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्यांनी क्षणाचाही वेळ न दवडता सायबर क्राईमचे कार्यालय गाठून आपबीती सांगीतली.

घटनेचे गांभीर्य ओळखून जमादार सुशांत शेळके व वैभव वाघचौरे यांनी तात्काळ संबधीत वॉलेटच्‍या कार्यालयाला मेल पाठवला, त्यानंतर नोडल ऑफिसरशी संपर्क साधून फसवणुकीची माहिती दिली. त्यामुळे मुख्याध्यापक राजेंद्र कहाटे यांची १ लाख ४५ हजार रुपयांची रक्कम परत मिळाली. सहसा ऑनलाईन फसवणुकीतील रक्कम परत मिळणे अवघड असते. मात्र या प्रकरणात पोलिसांच्या तत्परतेने ही रक्कम परत मिळाली. त्यामुळे राजेंद्र कहाटे यांनी सायबरचे पोलिस निरिक्षक गौतम पातारे व त्यांच्या टीमचे आभार मानले.