फक्त 60 रुपयांसाठी ‘त्यानं’ आपल्या अल्पवयीन मित्राची दगडाने ठेचून केली हत्या

Murder
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशात हमीरपूर इथं ११ वर्षाच्या मुलाच्या हत्याकांडाचा खुलासा पोलिसांनी केला आहे. आरोपी आणि मृत मुलगा दोघंही मित्र होते. यामध्ये ६० रुपयांची उधारी मागितल्यावर १३ वर्षाच्या मित्रानं ११ वर्षीय मित्राची दगडानं ठेचून हत्या केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी १३ वर्षीय आरोपीला अटक केली आहे. तसेच या घटनेची पुढील चौकशी सुरु करण्यात आली आहे.

मृतदेहाचे ११ तुकडे
मृत मुलाचा मृतदेह एका जंगलात आढळला. मृत मुलाचा मृतदेह जंगलातील वन्यप्राणी आणि कुत्र्यांनी खाऊन त्याचे ११ तुकडे केले होते. जुगारात हरलेले ६० रुपये मागितल्यामुळे ही धक्कादायक घटना घडली आहे. आरोपीनं पोलिसांच्या चौकशीत आपण केलेल्या हत्येची कबुली दिली आहे. दोन दिवसांपूर्वी काशीराम कॉलनीनजीक जंगलात क्षिनविक्षिन्न अवस्थेत एक मृतदेह आढळून आला होता.

अशाप्रकारे झाला खुलासा
पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरु केली असता त्यांना समजले कि, कांशीराम कॉलनीत राहणारा मुलगा मृत मुलाचा जिगरी दोस्त आहे. त्याला पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं असता त्याने पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली. यामुळे पोलिसांना त्याच्यावर अधिक संशय आला. त्यानंतर पोलिसांनी अधिक चौकशी केली असता आरोपी मुलाने आपला गुन्हा कबुल केला आहे.

४ महिन्याची मैत्री अन् ४ मिनिटांत हत्या
अल्पवयीन आरोपीने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हंटले कि, जवळपास ४ महिन्यापूर्वी आमची मैत्री झाली होती. एकेदिवशी सामान आणण्यासाठी घरच्यांनी ६० रुपये दिले होते. ते मी मित्रांसोबत जुगारात हरलो. घरात सामान घेण्यासाठी मी माझ्या मित्राकडून ६० रुपये उधारी घेतली होती. पैसे परत मागताना तो शिवीगाळ करु लागला. तेव्हा मी त्याला जंगलाच्या दिशेने नेले आणि तिकडे या दोघांचे पुन्हा भांडण झाले. यावेळी आरोपीने त्याला ढकलून खाली पाडलं त्याने बाजूचा दगड घेऊन मला मारण्याचा प्रयत्न केला परंतु मी तसं होऊ दिलं नाही. मी त्याच्या हातातून दगड खेचून त्याच्या डोक्यात मारला तेव्हा तो रक्तबंबाळ झाला.

झाडात लपवण्यात आला मृतदेह
यानंतर आरोपीने जखमी मित्राला घनदाट जंगलातील झाडामागे लपवलं. त्यावेळी त्याचा श्वास सुरु होता. दगड नाल्यात फेकून दिला. त्याच नाल्यातील पाण्याने मी कपड्यांना लागलेले रक्त धुवून टाकलं आणि घरी निघून गेलो असे आरोपीने आपल्या जबाबात म्हंटले आहे.